तिने स्वतःच सांगितलंय.! १८व्या वर्षी केला होता पहिला ‘किस’, तर हा अभिनेता होता पहिला…

तिने स्वतःच सांगितलंय.! १८व्या वर्षी केला होता पहिला 'किस', तर हा अभिनेता होता पहिला...


हिंदी सिनेसृष्टीतील बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा. परिणीती तिच्या बहिणीच्या म्हणजेच प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.

‘इशकजादे’ सिनेमातून परिणितीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तिला तिच्या या डेब्यूसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले. त्यानंतर परिणितीची रुपेरी पडद्यावरील गाडी वेगाने धावू लागली. मात्र, काही काळापूर्वी तिच्या करियरला ब्रेक लागल्याचे दिसून आले होते. परंतू, आता परिणितीने पुन्हा धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

परिणितीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ नावाचा सिनेमा नुकताच नेटफिल्क्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. परिणितीने या सिनेमात एक गंभीर स्वरूपाची भूमिका साकारली असून हा सिनेमा हॉलिवूडचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा हिंदी रिमेक आहे.

परिणितीच्या या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने नेटफिल्क्सने तिच्या एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत पेजवरून पोस्ट केला आहे. ‘डू यू रिमेंबर?’ असे या व्हिडिओचे नाव असून, तिने यात तिच्या आयुष्यातील अनेक गुपिते उघड केली आहे.

यात परिणितीला अनेक प्रश्न विचारले असून, तिने त्याची उत्तरे दिली आहेत. यात तिला विचारले तू शेवटचा मेसेज कोणाला केला? यावर तिचे उत्तर होते, “माझी मॅनेजर नेहा.” ती पुढे म्हणते, “मी माझ्या आयुष्यातले पहिले किस १८ वर्षाची असताना केले होते. मी कधीच डेटला गेली नाही. आम्ही दोघे घरीच भेटायचो. सोबत वेळ घालवायचो. बाहेरून जेवण मागवून सोबत जेवायचो.” तिच्या क्रशबद्दल सांगताना ती म्हणाली, “माझा पहिला क्रश सैफ अली खान हा आहे.”

परिणितीच्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात परिणितीसोबत अदिति राव हैदरी, कीर्ति कुल्हारी आणि अविनाश तिवारी अशी दमदार कलाकारांची फौज आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.