Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. यामध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या राजकुमार रावचाही समावेश होतो. राजकुमारने मागील महिन्यात १५ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. त्याने गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत संसार थाटला. यानंतर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये दोघे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केल्याबाबत खूपच उत्साहित असल्याचे दिसले. मात्र, आता या जोडप्यामध्ये काही दिवसांचे अंतर पडले आहे, ज्यामुळे अभिनेत्री पत्रलेखा खूपच भावनिक झाली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विमानतळावर जाताना राजकुमारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने एक भावनिक संदेशही लिहिला आहे. तिची पोस्ट व्हायरल होतेय.

राजकुमार जाताना पाहून भावुक झाली पत्रलेखा
पत्रलेखाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजकुमार राव विमान पकडण्यासाठी विमानतळावर जाताना दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. त्याच्या हातात एक सुटकेस आहे आणि तो आपल्या पत्नीकडे पाहून हात हलवताना दिसत आहे. पत्रलेखाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत..” यासोबतच तिने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. (Patralekhaa Gets Emotional At Airport On Saying Good Bye To Hubby Rajkummar Rao)

Photo Courtesy Instagrampatralekhaa rajkummar rao

राजकुमार रावनेही पत्रलेखाचा हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. तसेच, त्याने रेड हार्ट इमोजीचाही कॅप्शनमध्ये समावेश केला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे नवविवाहित जोडपे एकमेकांपासून वेगळे होत आहे. यापूर्वी दोघांच्या लग्नाचे अतिशय सुंदर फोटो समोर आले होते, ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

राजकुमार आणि पत्रलेखा लग्नाच्या कपड्यांमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ असल्याचे दिसले. या फोटोंमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे पत्रलेखाच्या लग्नातील तिची ओढणी, ज्यावर बंगाली भाषेत लिहिले होते, “मी माझे प्रेमळ हृदय तुला समर्पित करतो.”

राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ते दोघेही ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. याव्यतिरिक्त राजकुमार हा ‘भीड’, ‘बधाई दो’ यांसारख्या चित्रपटात झळकताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

हे देखील वाचा