Wednesday, April 16, 2025
Home अन्य कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

लोकप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिचा प्रियकर विक्की जैनसोबत (Vicky Jain) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अशामध्ये अंकिताच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. विधी पूर्ण होण्याआधी सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूट व्हिडिओ देखील शेअर केले होते. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये ती समुद्रकिनारी रोमान्स करताना दिसत आहे. विक्की आणि अंकिताचे प्री वेडिंग शूटचे व्हिडिओ खूप रोमँटिक आहेत. अभिनेत्रीचे चाहते या व्हिडिओवर खुप प्रेम व्यक्त करत आहे.

अंकिता आणि विक्कीने केले रोमँटिक प्री-वेडिंग शूट
अंकिता लोखंडेने या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे, तर विकीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅंट घातली आहे. अंकिता आणि विकीचा हा रोमँटिक व्हिडिओ पाहून चाहते पुरते वेडे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता १४ डिसेंबरला लग्न करणार आहे. अंकिता आणि विकी ग्रेड हयात येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. (pavitra rishta actress ankita lokhande pre wedding shoot)

लग्नानंतर असणार रिसेप्शन पार्टी
अंकिताच्या लग्नाचे विधी १२ डिसेंबरपासून सुरू झाले आहेत. १२ डिसेंबरला हे दोघे साखरपुडा करणार आहेत. यानंतर मेहंदीचा फंक्शन होणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील ही अभिनेत्री महाराष्ट्रीयन रीतीरिवाजाप्रमाणे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार आहे. अंकिताच्या लग्नाची थीम रॉयल डेस्टिनेशन स्प्लेंडर ही ठेवली आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने रिसेप्शन पार्टीचा देखील प्लॅन केला आहे.

डॉक्टरांनी अंकिताला सांगितली ‘बेडरेस्ट’
अंकिता लोखंडे लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. परंतु दरम्यान तिला दुखापत झाल्याने, डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट सांगितले आहे. अंकिता लग्नाला घेऊन खूप एक्साईट आहे. चाहते देखील अंकिताच्या लग्नाची वाट उत्सुकतेने पाहत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा