मेहेंदी हैं रचनेवाली! अंकिता लोखंडेचे मेहेंदी फंक्शन संपन्न, ‘या’ प्रसिद्ध आर्टिस्टने लावली तिला मेहेंदी


अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच (Ankita Lokhande) विवाहबंधनात अडकणार आहे. मागील काही दिवसांपासून अंकिताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यातच अंकिताला दुखापत झाल्यामुळे तिचे लग्न होते की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र नुकतेच अंकिताच्या मेहेंदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ११ डिसेंबर रोजी अंकिताचे मेहंदी फंक्शन झाले. या मेहंदी फंक्शनचे फोटो पाहिल्यावर लक्षात येईल की, अंकिताचा हा सोहळा किती मोठ्या स्वरूपात संपन्न झाला. अंकिता लोखंडे तिचा प्रियकर विक्की जैन (Viki Jain) सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता आणि विक्की त्यांचे लग्न अविस्मरणीय होण्यासाठी सर्वच फंक्शन खूप खास पद्धतीने साजरे करत आहेत. प्रत्येक विधीसाठी त्यांनी खूप खास नियोजन देखील केले आहे.

अंकिता लोखंडेने तिच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी मनोरंजनविश्वातील फेमस मेहंदी आर्टिस्ट ‘वीणा नगाडा'( Veena Nagada) यांना बोलवले होते. अंकिताच्या हातावरची मेहंदी काढताना वीणा यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वीणा यांनी देखील या फंक्शनचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

समोर आले काही फोटोज आणि व्हिडिओ ज्याच्या मध्ये अंकिता खूप मस्ती करते आणि खूप खुश देखील दिसत आहे. याच बरोबर तिने मेहंदीच्या विधीमध्ये  डान्स देखील केला आहे. याच बरोबर ‘मेहंदी हे रचने वाली’ या गाण्यावर  ती बसूनच नाचत आहे. प्रेक्षकांना अंकिताचे हे बिनधास्त वागणे खूप आवडले आहे.

मागील अनेक दिवसांपासून अंकिता तिच्या लग्नामुळे लाईमलाइटमध्ये आली आहे. कॅटरिना आणि विकी यांचे लग्न झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अंकिता आणि विकी यांच्या लग्नाकडे लागले आहे. अंकिता लोखंडे आणि विक्की जैन १४ डिसेंबरला मुंबई मधील ग्रेट हायात हॉटेल मध्ये लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंकिता आणि विक्की १२ डिसेंबरला एंगेजमेंट करणार आहेत. आणि १२ डिसेंबरला हळदी आणि संगीत आयोजित केले आहे. आणि ते त्यांच्या लग्नामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंब हे सहभागी असतील.

हेही वाचा-

अचानक एक्सिट घेतलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

‘विकी भाऊ अन् कॅटरिना वहिनी यांना लग्नाच्या शुभेच्छा’, म्हणत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केली लक्षवेधी कमेंट

मार्वल स्टुडिओचा चित्रपट थेट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, डिज्नी प्लस हॉटस्टारवर हिंदीसह ६ भाषांमध्ये उपलब्ध


Latest Post

error: Content is protected !!