Bigg Boss 15: राखी सावंतसोबत पहिल्यांदाच रोमॅंटिक झाला रितेश, थेट ऑनस्क्रीन केले ‘लिप-लॉक!’


बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi sawant) अलिकडेच सर्व जगाला तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवला आहे. ‘बिग बॉस १५’ मध्ये राखी आणि तिचा नवरा रितेशने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. शोमध्ये दोघेही धमाल करत आहेत. प्रत्येक ठिकाणी या दोघांची चर्चा सुरू आहे. एकीकडे असे म्हटले जात आहे की, रितेश हा राखीचा खरा नवरा नाहीये. तर शोमध्ये दोघांचे नाते खूप चांगल्याप्रकारे दिसत आहे. परंतु या दरम्यान राखी आणि रितेश ऑन स्क्रीन लिपलॉक करताना दिसले आहेत.

राखी सावंत आणि रितेशबद्दल आत्तापर्यंत हेच म्हटले जात होते की, हे दोघे फक्त या शोपूरते नवरा-बायको बनले आहेत. परंतु राखीला अशाप्रकारे रितेशने सर्वांसमोर लीप लॉक करणे, हे काही वेगळेच सांगत आहे. नवऱ्याने असे अचानक लीप लॉक केल्यावर राखी देखील आश्चर्यचकित झाली आणि लाजायला लागली. (bigg boss 15 ritesh kisses rakhi sawant actress cant stop blushing)

ऑनस्क्रीन केलं लिप लॉक
या लिपलॉकच्या आधी रितेश आणि राखी रोमँटिक मूडमध्ये पाहायला मिळाले. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांना पाहत होते आणि त्यावेळी रितेश राखीला किस करतो. यानंतर राखी लाजते. राखीला असे लाजताना पाहून करण कुंद्रा बोलतो की, “अरे ही लाजत आहे.”

रितेशची बायको राखी नाही
सोशल मीडियावर रितेशचे जुने फोटो चर्चेमध्ये आहेत. हे फोटो शेअर करत असे सांगितले जात आहे की, रितेश राखीचा नवरा नाहीये. कारण त्याचे पहिले लग्न झालेले आहे. त्याचे एक कुटुंब आहे. या फोटोमध्ये रितेश मंडपामध्ये बसलेला दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये स्त्रीसोबत आणि मुलासोबत दिसत आहे.

रितेशच्या पहिल्या बायको सोबतचे फोटो व्हायरल
मंडपामध्ये जी रितेशसोबत महिला दिसत आहे ती राखी नाहीये. हे फोटो पाहून असे सांगितले जाते की त्याची खरी पत्नी ही आहे. बिग बॉसच्या माहिती देणाऱ्या माहितीदाराने असे ट्विट केले आहे की रितेश ने २०१४ मध्ये लग्न केलं होतं आणि त्याला एक मुल देखील आहे. सोशल मीडिया वरती शेअर केलेला फोटो मध्ये रितेश त्या महिलेसोबत आणि एका मुलासोबत दिसत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!