Monday, May 27, 2024

‘धनिया हमार नया बाड़ी’ या छटपूजेवरील गाण्याचा जुना व्हिडिओ व्हायरल, प्रेक्षकांचा गाण्याला अमाप प्रतिसाद

विविधतेमध्ये एकता असणाऱ्या आपल्या देशात अनेक भाषा अनेक बोली आहेत. प्रत्येक प्रदेशानुसार आपल्याला वेगवगेळ्या भाषा, वेगवेगळे सण पाहायला मिळतात. या सणांवर आधारित नवनवीन गाणी तयार केली जातात. जेव्हा ते सण येतात तेव्हा ही गाणी प्रदर्शित केली जातात. प्रत्येक भागात जो महत्वाचा सण असतो त्यावर आधारित गाणे येतेच येते.

आता यूपी, बिहारच्या भागात छट पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. लवकरच छट पूजा येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भोजपुरी भाषेत अनेक नवनवीन गाणी तयारी होत आहे, तर काही गाणी प्रदर्शित सुद्धा झाली आहे. मात्र यातच छटपूजेवर आधारित असलेले पवन सिंग आणि निलीम गिरीच्या ‘धनिया हमार नया बाड़ी’ या गाण्याचा जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जरी या गाण्याचा व्हिडिओ जुना असला तरी तो सध्या तुफान गाजत आहे. या गाण्याला यूटुबवर तुफान प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज गाण्याला मिळाले आहेत. हे गाणे भाळेलही मागच्यावर्षी प्रदर्शित झाले असले तरी या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.

‘धनिया हमार नया बाड़ी’ हे गाणे वर्ल्डवाईड रिकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले होते. या छटपूजेच्या गाण्याचे निर्माते रत्नाकर कुमार असून शब्द आजाद सिंह आणि श्याम देहाती यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याला संगीत छोटे बाबा यांनी दिले आणि दिग्दर्शन रवी पंडित यांनी केले आहे. लोकांना हे गाणे तुफान आवडत असून, ते या गाण्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

छटपूजा २०२१ साठी सोनू निगम आणि पवन सिंग यांचे ‘जय छठी मईया’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला सोनू निगम, पवन सिंग आणि खुशबू जैन यांनी आवाज दिला असून हे गाणे I Believe Music या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा