रविवारी लग्नाचा बार उडविणाऱ्या वरुण धवनच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लाखो लाईक्स व हजारो कमेंट्सचा पाऊस


नुकतेच वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. अतिशय खाजगी पद्धतीने जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (सोमवारी) वरुण आणि नताशाच्या लग्नाआधी झालेल्या विविध कार्यक्रमाचे अनेक फोटो आता इंटरनेटवर वायरल होत आहे.

वरुणच्या हळदीचे अनेक फोटो सोशल मीडियावर आले आहेत. एका फोटोमध्ये वरुण शर्टलेस होत त्याचे मसल्स दाखवत आहे. त्याच्या संपूर्ण शरीराला हळद लावलेली असून तो सनग्लासेस घालून पोज देत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये वरुण आणि त्याचे मित्र पोज देत आहे. या ग्रुप फोटोचे वैशिट्य म्हणजे, त्याच्या मित्रांनी घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या शर्टवर वरुणच्या भूमिकांची नावे लिहिली आहेत.

वरुणच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर आतापर्यंत या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. वरुणने देखील त्याच्या फॅन्सला जास्तवेळ ताटकाळत न ठेवता लगेच त्याच्या आणि नताशाच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. हे फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले की, ‘तिची सोबत आधीपासूनच होती, आता फक्त आमचे नाते अधिकृत केले आहे.’ वरुणच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकार देखील या नवदाम्पत्याला शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान या दोघांच्या लग्नात जवळच्या फक्त ५० लोकांचाच समावेश होता. या सर्व ५० लोकांच्या कोरोना टेस्ट देखील केल्या गेल्या. या लग्नात इंडस्ट्रीमधील फक्त करण जोहर, शशांक खेतान, कुणाल कोहली, मनीष मल्होत्रा हेच उपस्थित होते. अलिबागच्या ‘द मैनशन हाउस’ या हॉटेलमध्ये या दोघांनी लगीनगाठ बांधली आहे. लग्नानंतर या जोडप्याने बाहेर येऊन मीडियाला पोज देखील दिली. यावेळेस सर्व पापाराझीं आणि मीडियाने वरुण, नताशाला शुभेच्छा देखील दिल्या.


Leave A Reply

Your email address will not be published.