आनंदाची बातमी! यंदा थेट चित्रपटगृहात बसून प्रेक्षक घेऊ शकणार ‘पिफ’चा आनंद, ‘या’ तारखेपासून होतोय सुरू


पुणे फिल्म फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) येत्या २ ते ९ डिसेंबर दरम्यान भरविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे.

महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि चित्रपट निवड समिती सदस्य अभिजित रणदिवे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. (PIFF to take place between December 2nd and 9th)

महाराष्ट्र सरकाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला सदर महोत्सव याआधी मार्च २०२१ मध्ये होणार होता, परंतु राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तो स्थगित करण्यात आला आणि काही निवडक चित्रपटांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यावर राज्य सरकारने सिनेमागृह उघडण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे महोत्सव आता राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून चित्रपटगृहांमध्ये भरविता येणे शक्य असल्याने येत्या २ ते ९ डिसेंबर, २०२१ दरम्यान चित्रपट रसिकांना उत्कृष्ठ दर्ज्याच्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. सुमारे १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जातील. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी येत्या १८ नोव्हेंबर पासून सुरू होईल, तर २२ नोव्हेंबरपासून महोत्सव होणाऱ्या तिन्ही चित्रपटगृहांमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये ६०० इतके आहे.

महोत्सवातीलमराठी स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे-
१. पोरगा मजेतंय (दिग्दर्शक – मकरंद माने)
२. फिरस्त्या (दिग्दर्शक-विठ्ठल मच्छिंद्र भोसले)
३. फन’रळ (दिग्दर्शक – विवेक दुबे)
४. जून (दिग्दर्शक – वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले)
५. गोदाकाठ (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे)
६. काळोखाच्या पारंब्या (दिग्दर्शक – मकरंद अनासपुरे)
७. टक – टक (दिग्दर्शक – विशाल कुदळे)

स्पर्धेव्यतिरिक्त प्रेमिअर होणारे ‘मराठी सिनेमा टूडे’ विभागातील चित्रपट-
१. गोत (दिग्दर्शक – शैलेंद्र कृष्णा)
२. ताठ कणा (दिग्दर्शक – गिरीश मोहिते)
३. कंदील (दिग्दर्शक – महेश कंद)
४. मे फ्लाय (दिग्दर्शक – किरण निर्मल)
५. जीवनाचा गोंधळ (दिग्दर्शक – प्रशांत दत्तात्रय पांडेकर)

याबरोबरच जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाण-
१.शुड द विंड ड्रॉप (दिग्दर्शक – नोरा मार्टिरोस्यान, फ्रांस, अर्मेनिया, बेल्जियम)
२.इन द शॅडोज (दिग्दर्शक – अर्दम टेपेगोज, टर्की)
३.अप्परकेस प्रिंट (दिग्दर्शक- रादू जुडे, रोमानिया)
४.ए कॉमन क्राईम (दिग्दर्शक- फ्रान्सिस्को मारिकेज्, अर्जेंटिना/ ब्राझिल/ स्वित्झर्लंड/ यु.के)
५.द एलियन (दिग्दर्शक- नादर साइवर, इराण)
६.काला अझार (दिग्दर्शक – यानिस रफा, नेदरलँड्स / ग्रीस)
७.ट्रू मदर्स (दिग्दर्शक – नाओमी कवासे, जपान)
८.नाईट ऑफ द किंग्ज – (दिग्दर्शक – फिलीप लाकोत, फ्रांस, कॅनडा, सेनेगल)
९. रशियन डेथ (दिग्दर्शक – व्लादिमीर मीरझोएव्ह, रशिया)
१०.डिअर कॉमरेड्स (दिग्दर्शक – आंद्रेई कोंचालोव्स्की, रशिया)
११.शर्लटन (दिग्दर्शक – अॅग्नीएश्का हॉलंड, चेक/ पोलंड)
१२.द बेस्ट फॅमिलिज् – (दिग्दर्शक- जेव्हीअर फुएन्तेस – लिऑन, कोलंबिया- पेरू)
१३.आयझॅक – (दिग्दर्शक – युर्गीस मॅटुलेव्हिशीयस, लिथुनीया)
१४. १२ बाय १२ अनटायटल्ड – (दिग्दर्शक –गौरव मदान, भारत)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराववर हिंसाचारासह मारहाणीचा गुन्हा दाखल, पत्नीने केले गंभीर आरोप

-बायकोची प्रगती बघवेना, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून पत्नीला मारहाण; कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल

-नॉमिनेशन कार्यात सोनाली आणि जयमध्ये उडाला भडका, टीमला मदत केल्याचा लावला आरोप


Latest Post

error: Content is protected !!