आयो! परफेक्ट फोटोशूटच्या नादात अभिनेत्री आलिया फर्नीचरलवाला झाली जखमी, तरीही ‘वर्क फर्स्ट’ म्हणत पुर्ण केले शुट


गेल्या वर्षी आलेल्या ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून सैफ अली खानसोबत पदार्पण केलेली अभिनेत्री आलिया फर्नीचरवाला नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आणि अभिनेते कबीर बेदी यांची नात असलेल्या आलियाने तिच्या अभिनयात येण्याच्या आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय असलेल्या आलियाला लाखो फॉलोवर्स आहे.

आलियाने नुकताच तिचा एक सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मोनोक्रोम घालून स्विमिंग पूलमध्ये उडी घेतानाच हा फोटो आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, ” काश मी तुम्हाला सांगू शकली असती, की हा परफेक्ट फोटो घेताना माझ्या गुडघ्याला किती लागले आणि माझे किती प्रयत्न अयशस्वी झाले.”

अनेक प्रयत्नानंतर तिचा हा सुंदर फोटो आला आहे. तिच्या फॅन्सने देखील या फोटोला लाइक्स आणि कमेंट्स करत पसंतीची पोचपावती दिली आहे.

 

आलियाने मागच्यावर्षी ‘जवानी जानेमन’ सिनेमातून एन्ट्री घेतली होती. सध्यातरी तिच्या आगामी सिनेमांची घोषणा झाली नाहीये.

हेही वाचा-

आलियाने रणबीरशी केले गुपचूप लग्न? व्हायरल फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पहिल्या मकरसंक्रांतीच्या हळदी- कुंकूचे फोटो केले शेअर; साडीमध्ये खुलून आलं रूप

चाळीशी नंतरही सर्वांना हेवा वाटावा, असा फिटनेस ठेवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे हे वेड लावणारे फोटो पाहिलेत का?

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.