चाळीशी नंतरही सर्वांना हेवा वाटावा, असा फिटनेस ठेवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे ‘हे’ वेड लावणारे फोटो पाहिलेत का?


शिल्पा शेट्टी हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पाने वयाची चाळीशी ओलांडली आहे असे असूनही तिचा फिटनेस २० व्या वर्षीच्या मुलीला टक्कर देणारा आहे. शिल्पाने स्वत: जबरदस्त मेंटेन ठेवले आहे. नियमित योगा, व्यायाम आणि योग्य डाएट यामुळेच तिने तिचे फिटनेस जपले आहे. शिल्पा ही अशा अभिनेत्रींमध्ये गणली जाते, ज्या इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून आजपर्यंत सारख्याच दिसतात.

शिल्पा नेहमी सोशल मीडियावर तिच्या योगाचे, व्यायामाचे आणि हेल्दी रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट करत असते. रोजच्याच जेवणातून आणि घरकामातून आपण आपला फिटनेस कसा जपू शकतो, हे नेहमी ती सोशल मीडियावर सांगत असते. सगळ्यांना तिच्या फिटनेसचा आणि फिगरचा हेवा वाटावा अशी ती आहे. नुकताच तिने तिचा लाल साडीतील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो फोटो पाहून तुम्ही, आम्ही सर्वच तिच्या प्रेमात पडू इतकी सुंदर ती दिसत आहे.

शिल्पाने नुकतेच एका जाहिरातीसाठी शूटिंग केले आहे. त्या शूटिंगच्या वेळेलाच हा फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोला प्रचंड कमेंट्स आणि लाईक्स येत आहे. दोन मुलांची आई असलेल्या शिल्पाचा फिटनेस पाहून तिचे फॅन्स तोंडात बोटं घालत आहेत.

शिल्पाने या जाहिरातींच्या शूटिंगच्या वेळी मजेत तिला ही जाहिरात तिच्या फिट कंबरेमुळेच मिळाली असल्याचे सांगितले. शिल्पाचा हा लुक सर्वांनाच घायाळ करत आहे.

अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसणारी शिल्पा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिने तिचे हे फोटो पोस्ट करताना लिहिले की, “सॉरी बट न सॉरी.” तिच्या या फोटो आणि व्हिडिओंना आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर १३ वर्षांनंतर शिल्पा पुन्हा चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. लवकरच ती ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ या चित्रपटात दिसणार आहे. हे दोन्ही सिनेमे याचवर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.