Tuesday, March 19, 2024

अखेर अभिनेत्री वनिता खरात अडकली लग्नबंधनात, पारंपरिक मराठमोळा लूक ठरला लक्षवेधक

मराठी इंडस्ट्रीमधील विनोदी अभिनेत्री असणारी वनिता खरात अखेर आज २ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकली आहे. मागील काही दिवसांपासून सतत वनिताचे लग्न चर्चेत होते. अतिशय मोजक्या जवळच्या लोकांच्या उपस्थित तिने तिचा मित्र सुमित लोंढेसोबत लगीनगाठ बांधली आहे. वनिताची मेहेंदी, हळद हे कार्यक्रम तुफान गाजले. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. आता तिच्या लग्नाचे फोटो समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ananda creation (@diaries_of_ananda)

वनिताचा लग्नातला फोटो अतिशय सुरेख आणि आकर्षक असून या फोटोमध्ये दोघांचाही लूक पारंपरिक दिसत आहे. वनिताने लग्नासाठी क्रीम रंगाची नऊवारी साडी, त्यावर गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज आणि गुलाबी रंगाचा पैठणीचा शेला परिधान केला. यासोबत तिने पारंपरिक दागिन्यांना प्राधान्य दिले. यात तिने कोल्हापुरी साज, लफ्फा आदी दागिने घातले होते. या सर्व गोष्टींमुळे वनिताचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. तर तिचा नवरदेव असणाऱ्या सुमितने देखील तिच्याच लुकशी मिळणार लूक केला होता. यात त्याने क्रीम रंगाची शेरवानी घालत, त्यावर गुलाबी रंगाचा शेला आणि गुलाबी रंगाचाच फेटा परिधान केला होता. या लूकमध्ये त्याने वनिताला चांगलीच टक्कर दिली. वनिता आणि सुमितच्या लग्नाचा पहिला फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वनिता आणि सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांनी देखील या लग्नच अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लग्नानंतर त्यांचे ग्रँड रिसेप्शन देखील पार पडले. या रिसेप्शसाठी वनिताने डिझायनर साडी तर सुमितने फॉर्मल सूट घातला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा