Saturday, June 29, 2024

‘मंडप’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; अभिनेत्री म्हणाली, ‘परिणाम आजही मुलींना भोगावे लागता पण…’

आजही भारतात मुलींची लग्न 18 वर्षपुर्ण नसेल तरीही केले जाते. सध्या बालविवाह देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याचं वेळी आपल्या समाजात ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ अशी घोषणा दिली जाते. पण या घोषणेची अंमलबजावणी कितपत होते हा आजही मोठा प्रश्न आहे. आपल्या मुलीचे लग्न चांगल्या घरात व्हावे असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. पण चांगल्या घरात नाते जोडण्यासाठी बाप कंबर कसतो. कारण आजही भारतात मुलीचे लग्न असेल तर बापाला मुलीच्या सासरच्या माणसांना हुंडा द्यावा लागतो. लग्नावर आधारित भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि खासदार दिनेश लाल यादव निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांचा ‘मंडप’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला आहे.

‘मंडप’ (Mandap Trailer) चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात हुंड्याच्या व्यवहारापासून होते. जेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडिलांकडे ‘तीस लाख रुपये रोख, वरून समान, चार चाकी गाडी’ अशी मागणी केली आहे. त्यांनंतर हिरोची एंट्री होते आणि मुलाचे वडील आणि मुलीचे वडिल एकमेकांना भेटतात. दुसरीकडे, मुलाचे कुटुंबीय हुंड्यासाठी काही उरलेल्या पैशांची मागणी करताना दिसतात. जेव्हा मुलीला कळते की, तिच्या वडिलांनी सर्व काही गहाण ठेवून हुंड्याचे पैसे जमा केले आहेत, तेव्हा ती बारात्यांना बंदूक दाखवते आणि म्हणते, ‘जब तक हुंडा का पाई लौटा ना देब, तय ए बारात इन्हा से बापसा नहीं जाई’.

अभिनेता दिनेश लाल यादव (Dinesh Lal Yadav) म्हणाला की, “आजही आपल्या समाजात हुंड्याची मोठी समस्या आहे. कधी-कधी मुलाच्या लग्नासाठी किती हुंडा घेतला जातो हेही कळत नाही. जेव्हा लग्नाच्या वेळी वराच्या बाजूचे लोक मुलीच्या वडिलांना हुंड्यासाठी त्रास देतात आणि मुलगा शांतपणे सर्व काही पाहत असतो. मुलगी म्हणते की, तू सर्वांसमोर सिंदूर भरून सात जन्म पूर्ण करण्याचे वचन देतोस. पण आज लोक माझ्या बापाला त्रास देतात आणि तू गप्प बसतोयस? आजही आपली मूल्ये अशी आहेत की, आपण आधुनिक विचारसरणीचे झालो असलो तरी आपल्या मोठ्यांसमोर बोलत नाही. ही त्याच्याबद्दल आदराची बाब असेल, पण कुठेतरी काही चुकत असेल तर आवाज उठवला पाहिजे. ”

यावर अभिनेत्री आम्रपाली दुबे (Dowry practice) म्हणाली, ‘मंडप’ चित्रपटाच्या माध्यमातून खूप सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ नुसते बोलून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणीही व्हायला हवी. आजही समाजात हुंड्याची प्रथा दिसून येते आणि त्याचे परिणाम आजही मुलींना भोगावे लागतात. बाप आपल्या मुलीला काळजाचा तुकडा समजतो आणि तिच्या सुखासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावतो, तरीही हुंडा लोभीला पोट भरत नाही.” (Powerful trailer release of Mandap Trailer dinesh lal yadav nirahua and amrapali dubey film directed by anand singh)

अधिक वाचा- 
‘गदर 2’ हिट होताच बदलला सनी देओलचा सूर! महिला चाहतीला दिलेल्या वागणुकीमुळे भडकले नेटकरी, पाहा कमेंट्स
दलित समुदायाविषयी ‘ते’ विधान करून अभिनेत्याने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड! कडाडून विरोध होताच मागितली माफी

हे देखील वाचा