मराठी सिनेसृष्टीत अनेक बहिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. अनेक अभिनेत्री सख्या बहिणी असल्या सारख्या दिसतात. तर काही खरोखरच सख्या बहिणी मनोरंजन विक्ष्वात सक्रिय आहेत. यामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे, भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते, समिधा गुरू आणि मृणाल देशपांडे, खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे यांची नावे घेतली जातात. या सर्वजणी मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. तसेच त्या एकमेकींसाठी पोस्ट देखील शेअर करत असतात. अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या बहिणीसाठी एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे.
खुशबू तावडे (Khushboo Tawde) आणि तितिक्षा तावडेने (Titiksha Tawde) ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तितिक्षाने (Titiksha Tawde Instagram) तिची बहिण खुशबूसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तितिक्षा ही कविता ऐकवताना दिसत आहे. तर खुशबू तावडे ही भावूक झाल्याचे दिसत आहे.
या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “वा….वा…तितीक्षा….खूप छान ग….डोळ्यांत पाणी आलं ग..” दुसऱ्याने लिहिले की, “मोठी बहीण ही आई असते आणि ज्यांना मोठी बहीण आहे ना ते खूप नशीब वान आहे ,” तर आणखी एकाने, ” खरंच या दोघी बहिणी आहेत काय?” असा प्रश्न विचारला आहे.
View this post on Instagram
तितिक्षा तावडे सरस्वती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने या मालिकेत अभिनय करून चाहत्यांच्या मनात विषेश स्थान निर्माण केले आहे. सध्या तितिक्षा ही झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
अधिक वाचा-
–ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तिरंगा फडकवत शबाना आझमींनी साजरा केला स्वातंत्र्यदिन, म्हणाल्या, ‘अभिमान…’
–सोनालीचे हॉट फोटो पाहून चाहत्याने केली गजब मागणी; म्हणाला, ‘खूप दिवस झाले गं तू…’