Sunday, May 19, 2024

आता सुट्टी नाही! पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरूष’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

अभिनेता प्रभास आणि कृती सेनाॅनची प्रमुख भूमिका असलेला ‘आदिपुरूष‘ हा सिनेमा शुक्रवारी (16 जून) रिलीज झाला आहे. संपूर्ण देशातील प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत होते. ‘आदिपुरूष’ रिलीज होण्यापूर्वीच ऍडव्हान्स बुकींग करत सिनेमाने अर्धी कमाई केली. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाने पहिल्याचं दिवशी किती कमाई केली? हे तुम्हीला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपट ‘आदिपुरुष‘ (Adipurush) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ‘आदिपुरुष’बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरपुर कमाई करत अनेक विक्रम मोडले आहेत. केवळ हिंदीच नाही तर साऊथमध्ये प्रभासचा डंका वाजत आहे. ‘आदिपुरुष’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी ऐकून तुम्हाला आश्चर्यचा धक्काच बसेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘पठान’ चित्रपटानंतर ‘आदिपुरुष’ चित्रपटाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. त्याच वेळी, प्रभासच्या चित्रपटाने इतर भाषांमध्येही सुमारे 50 कोटींची कमाई गल्ला जमावला आहे. प्रभास आणि क्रिती सेननच्या या चित्रपटाने केवळ भारतात 120 ते 140 कोटींचा गल्ला जमावला आहे.

ऍडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत बोलायच झाल तर या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 150 कोटींहून अधिक गल्ला जमवू शकतो. ओम राऊतचा हा चित्रपट धमाकेदार कमाई करू शकतो. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट 250 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (Prabhas’ film Adipurush earned so much on its first day)

अधिक वाचा-
सनी लिओनी पुन्हा गाजविणार ‘बिग बॉस’चा मंच; कोणती भूमिका साकारणार, वाचा सविस्तर 

खेसारी लाल यादवच्या ‘सन ऑफ बिहार’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता 

हे देखील वाचा