Tuesday, June 25, 2024

प्रकाश झा यांनी अक्षय-शाहरुख-अजयची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘गुटखा विकण्यात व्यस्त…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक,अभिनेते आणि निर्माते प्रकाश झा(Prakash Jha) हे कायम सामाजिक विषयांवर काम करत असतात. तसेच ते सामाजिक असो किंवा मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी यावर व्यक्त होताना दिसतात. हे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांचे विषय आणि सेलिब्रिटींवर बेधडकपणे वक्तव्य करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

आपल्या चित्रपटांसाठी मोठा स्टार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. “तंबाखू विकून झाल्यानंतर जेव्हा यांना कथेवर लक्ष केंद्रीत करायचं असतं, तेव्हा ते माझ्याकडे येतात”, असा टोलाच त्यांनी लगावला. एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले, “इथे फक्त 5-6 अभिनेते आहेत. त्या अभिनेत्यांची हालत काय आहे ते पहा. जर त्यांना गुटखाच्या जाहिरातीसाठी 50 कोटी मिळत असतील तर ते चित्रपटांमध्ये का काम करतील? हे अभिनेते गुटखा विकत आहेत. तुम्ही कल्पना तरी करू शकता का? बॉलिवूडमधील हे दिग्गज कलाकार काय काम करत आहेत?”

“आम्ही एका शाळेत शूटिंगनिमित्त गेलो होतो. त्या शाळेचे मुख्याध्यापक मला विचारत होते की तुम्ही मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करत आहात? आमच्या शाळेतील मुलांना गुटखा खाताना पकडलं गेलंय. लखनऊ, प्रयागराज आणि मुगलसराई या भागांमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या गुटखा आणि पान मसाला विकण्याच्या जाहिराती होर्डिंगवर लावले आहेत”, असा अनुभव त्यांनी सांगितला.

“चित्रपट फक्त पैशांनी बनवता येत नाही. त्याची सुरुवात एका विषयाने होते. चित्रपट बनवण्याच्या आवडीने त्याची खरी सुरुवात होते. ते फक्त तुम्हाला मिळालेल्या 500 कोटींच्या गुंतवणुकीने होत नाही. पण सध्या हेच होताना दिसतंय. मी एकही दिवस शांतपणे बसलेलो नाही. मी सतत वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहे. गेले कित्येक महिने मी कोणत्या मोठ्या स्टारसोबत काम केलं नाही. पण ठीक आहे. मी माझ्या कामाबाबत खूश आहे. जेव्हा त्यांना गुटखा विकण्यापासून वेळ मिळेल, तेव्हा ते माझ्याकडे आपोआप येतील”, असंही त्यांनी म्हणून दाखवलं.

अलीकडेच अक्षय कुमार(Akshay Kumar), शाहरुख खान(Shah Rukh Khan) आणि अजय देवगण(Ajay Devgan) यांना पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीत दिसल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. अक्षयचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो कधीही गुटख्याची जाहिरात करणार नाही असे म्हणताना ऐकू येत आहे. ट्रोलिंगनंतर अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आणि म्हटले की, “मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिसादाने मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणार नाही. विमल इलाईची सोबतच्या माझ्या कराराच्या प्रकाशात मी तुमच्या भावनांचा आदर करतो. नम्रतेने, मी या जाहिरातीतून माझे नाव मागे घेतो.”

प्रकाश झा यांनी परिणती, मृत्यूदंड, दिल क्या करे, गंगाजल, अपहरण, राजनिती, आरक्षण, परीक्षा आणि सांड की आँख यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी आश्रम ही प्रसिद्ध वेब सीरिजसुद्धा दिग्दर्शित केली. ज्यामध्ये बॉबी देओल, अदिती पोहणकर, दर्शन कुमार, चंदन रॉय सन्याल, तुषार पांडे, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन आणि विक्रम कोच्चर यांच्या भूमिका होत्या.(prakash jha indirect dig on shahrukh khan akshay kumar ajay devgn top actors for selling gutkhas for money)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिला दिग्दर्शकीय सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच दाक्षिणात्य दिग्दर्शक जोसेफ मनु जेम्स यांचे अल्पशा आजाराने निधन
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

हे देखील वाचा