Wednesday, December 6, 2023

‘मला तुमचं ऐकायचं आहे…’, मुख्यमंत्र्यांनी मराठी कलाकारांशी साधला संवाद, ‘हे’ होते खास कारण

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहेत. नुकत्याच झालेल्या गणपती उत्सवामध्ये त्यांनी अनेक मराठी कलाकारांच्या घरी भेटी दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची भेट घेतली ज्याचे कारणही खूपच खास आहे. याबद्दलची पोस्ट अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना भेटीचे आवाहन दिले होते. मला तुमचं ऐकायच आहे. आपण कलाक्षेत्रात भरीव योगदान देत आहात. आयुष्यातील कठीण अवस्थेत कला काही काळ का होईना चिंतेपासून दूर ठेवते. तुम्हाला कलेबद्दल काही बोलायचे असेल तर कसलाही  आडपडदा न ठेवता विनासंकोच मला सांगा , असे म्हणत त्यांनी मराठी कलाकारांना भेटीचे आवाहन दिले होते.

या आवाहनानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याबद्दलची पोस्टही अभिनेता प्रसाद ओकने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रसाद ओकने सांगितले की, “मला तुमचं ऐकायचं आहे” असं म्हणत काल मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे यांनी नाटक,मालिका, आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातल्या अनेक लोकांशी वार्तालाप केला. अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले गेले. आमच्या अनेक अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. शासकीय पातळीवर संपूर्ण मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद खूपच महत्वाचा ठरेल अशी आशा वाटते. इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमचं ऐकल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनःपूर्वक आभार.
या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आमचे मित्र सचिन जोशी, विजू माने, आणि मंगेश देसाई यांचे आभार”

 

दरम्यान मुख्यमंत्र्याच्या या भेटीमध्ये प्रसाद ओक, अशोक सराफ, प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, अवधूत गुप्ते यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक कलाकारांनी त्यांच्या समस्या मांडल्या.

हेही वाचा- ‘परत या राजूजी…’ कॉमेडीयनच्या मृत्यूवर शैलेश लोढाची भावूक पोस्ट व्हायरल
शाहरूख खानच्या मुलीची भूमिका साकारलेली अंजली झालीये खूपच ग्लॅमरस, एकदा पाहाच
सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल

 

हे देखील वाचा