अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या ग्लॅमरस फोटोंची इंटरनेटवर धमाल, हजारांमध्ये मिळतायत लाईक्स


मराठी चित्रपटसृष्टीतील गोड आणि अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थना तिच्या अभिनयासोबतच, आगळ्या वेगळ्या हसण्यामुळे देखील ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमी ती तिच्या अकाऊंटवरून तिचे विविध फोटो फॅन्ससोबत शेयर करत असते.

भारतीय पोषाखासोबतच ती वेस्टर्न ड्रेसेस मध्ये देखील तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. प्रार्थना मागच्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत आहे. बहुतकरून तिचे हे फोटो साड्यांमधीलच आहे.

नुकतेच तिने तिचे नारंगी रंगाच्या साडीत तिचे फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तिच्या या फोटोना फॅन्सकडून आणि कलाकारांकडून देखील खूप लाईक्स आणि कमेंट्स येत आहे. प्रार्थनाचे हे फोटो कमी वेळातच इंटरनेटवर वायरल झाले आहे.

‘मितवा’, ‘मस्का’ तसेच ‘कॉफी आणि बरंच काही’ असे तिचे काही चर्चेतले चित्रपट आहे. ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत दिसलेली प्रार्थना लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार असल्याच्याही चर्चा मध्यंतरी खूपच रंगल्या होत्या. मात्र, तिने सध्यातरी चित्रपट आणि वेबसीरिजसाठी काम करत असल्याचे सांगितले आहे.

प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे काही शूटिंग लंडनमध्ये देखील झाले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.