डांसिंग सुपरमॉम! गरोदर करीनाने बेबी बंपसोबत केला क्युट डान्स, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल


विराट, अनुष्का यांच्या बाळानंतर आता सर्वाना करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या होणाऱ्या बाळाची उत्सुकता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करीना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाळाला जन्म देऊ शकते. करीनाची डिलिव्हरी जशी जवळ येत आहे, तसे खान घरात उत्साहाला उधाण येत आहे. येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी अनेक तयारी केल्या जात असून, नुकतेच सैफ आणि करीना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. त्यांच्या नवीन घराचे फोटो करीनाने सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

बॉलीवूडची ग्लॅमर अभिनेत्री करीना कपूर सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. करीना प्रेग्नेंट असली तरी खूप ऍक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, तिच्याबाबतीत अनेक अपडेट ती पोस्ट करून देत असते. करीनाच्या प्रसूतीची वेळ जवळ आली असली तरी ती तिचे हे दिवस मस्त घालवत आहे.

याचे एक उदाहरण म्हणजे नुकताच तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करीना चक्क तिच्या बेबी बंपसह डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ हेयर स्टाइलिस्ट यिआन्नी त्सापतोरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘डांसिंग सुपरमॉम करीना’ कॅप्शन देत शेयर केला आहे.

करीनाचा हा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. ह्या व्हिडिओला खूपच कमी वेळात लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये करीना क्युट डान्स करताना दिसत आहे. ऑरेंज रंगही टॉप आणि स्किन रंगाचा स्कर्ट घातलेली करीना खूपच लोभस दिसत आहे. त्यात तिचा गोड डान्स अजूनच छान वाटत आहे.

करीनाने तिच्या प्रेग्नेंसी काळातही तिच्या ‘लाला सिंह चड्ढा’ सिनेमाचे आमिर खान दिल्लीमध्ये जाऊन शूटिंग पूर्ण केले. शिवाय कोरोना वायरसच्या काळातही तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण पूर्ण केले. शिवाय ती थोडे दिवस हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन सुट्टी देखील एन्जॉय करून आली आहे.

करीनाने तिच्या या प्रेग्नेंसीच्या अनुभवावर आधारित ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बाइबल’ नावाचे पुस्तक देखील लिहिले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.