Sunday, June 23, 2024

‘पृथ्वीराज’ ठरणार अक्षय कुमारच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा, का आणि कसा जाणून घेण्यासाठी वाचा

अक्षय कुमार एका वर्षात अनेक सिनेमे देण्यासाठी ओळखला जातो. वर्षभरात एकापेक्षा जास्त हिट सिनेमे देणारा अक्षय नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निवड करत प्रेक्षकांच्या समोर आणत असतो. एका मागोमाग एक अक्षयचे चित्रपट येतच असतात. नुकताच अक्षयचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाला. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. एकीकडे सूर्यवंशी सिनेमाचे यश साजरे होत असताना दुसरीकडे अक्षयच्या आगामी ‘पृथ्वीराज सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमुळे पुन्हा एकदा अक्षय चर्चेत आला आहे. अतिशय भव्य असा टिझर असणारा अक्षयचा हा सिनेमा त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असणार आहे. आता हा सिनेमा वेगळा कसा ते जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

अक्षय कुमर नेहमीच त्याच्या अटींवर काम करतो. तो ज्या वेगात सिनेमे साईन करतो, त्याच वेगात तो त्यांचे चित्रीकरण देखील पूर्ण करतो. अक्षयची कामाची पद्धत वेगळी असल्याने तो त्याच्या अशा कामाच्या पद्धतीमुळे त्याच्या परिवाराला भरपूर वेळ देतो. मात्र अक्षयचे हे सर्व नियम, अटी या चित्रपटासटाही अपवाद ठरले. पृथ्वीराज सिनेमाचे वेळापत्रक आतापर्यतचे सर्वात मोठे आणि लांब ठरले आहे.

एका माहितीनुसार ‘पृथ्वीराज’ सिनेमा पूर्ण होण्यासाठी जवळपास ११० दिवस लागले. तसे पाहिले तर अक्षयचे सिनेमे ३०/४० दिवसात शूट होऊन पूर्ण होतात. यामुळेच त्याचे जास्तीत जास्त सिनेमे वर्षात प्रदर्शित होतात. ‘पृथ्वीराज’ सिनेमामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्सचा वापर केला असून, हा सिनेमा बहुतकरून हिरव्या पडद्यावर शूट झाला आहे. सध्या सोनू सूद त्याचे या सिनेमासाठीचे शूट करत असून, मानुषी छिल्लर आणि संजय दत्त यांनी त्यांचे शूट पूर्ण केले आहे. हा सिनेमा येत्या २१ जानेवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा