Saturday, April 20, 2024

अमेरिकेला गेल्यावर प्रियांका चोप्राने विकली मुंबईमधील आलिशान संपत्ती; तब्बल ७ कोटींमध्ये झाला व्यवहार

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी जगातील प्रसिद्ध विवाहित जोडप्यांपैकी एक आहे. डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघेही आपापल्या कला आणि क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. यामुळे त्यांची संपत्तीही लक्षणीय वाढत आहे. प्रियांका चोप्रा आता एक जागतिक अभिनेत्री म्हणून भारताबाहेर आपली पताका फडकवत आहे, तर निक जोनास यापूर्वीच एक अतिशय प्रसिद्ध गायक आहे.

लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत स्थलांतरित झाली आहे. त्यांची मुंबईतील मालमत्ता वापरली जात नव्हती आणि ती बंद पडलेली आहे. अशा परिस्थितीत प्रियंकाने ही संपत्ती कोट्यावधी रुपयांत विकली आहेत. जर अहवालांवर विश्वास ठेवला, तर प्रियांकाचे मुंबईत दोन अपार्टमेंट होते. जे तिने ७ कोटी रुपयांना विकले. यावर्षी मार्चमध्ये प्रियांकाने हा करार केला होता आणि आता हा खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार प्रियांकाचे राज क्लासिक, वर्सोवा, अंधेरी (वेस्ट) मुंबई येथे सातव्या मजल्यावर दोन अपार्टमेंट होते. यामध्ये एका अपार्टमेंटची किंमत सुमारे चार कोटी आणि दुसर्‍या अपार्टमेंटची किंमत तीन कोटी आहे. यापूर्वी प्रियांकाने तिचे करण अपार्टमेंट्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (वेस्ट) चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंट हे २ कोटी रुपयांना विकले होते. (priyanka chopra offloads apartments worth 7 crore leases office for 2 lakh per month says report)

 

असं सांगितलंं जातंय की, अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवाडा येथे असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसची मालमत्ता देखील यावर्षी जुनमध्ये भाडेतत्त्वावर दिली आहे. हे कार्यालय २०४० चौरस फूटमध्ये असून हे भाड्याने देऊन प्रियांकाला जवळपास २.११ लाख रुपये भाडे मिळत आहे.

इतकेच नाही तर प्रियांकाचा जवळ मुंबईतील जुहूमध्ये एक आलिशान बंगला आहे. येथेच निकबरोबर तिचा साखरपुडा सोहळा झाला. याशिवाय गोव्यातील बागा बीचजवळ सुध्दा एक घर आहे. एका अहवालानुसार प्रियांका आणि निक यांची एकूण संपत्ती ७३४ कोटी रुपये आहे. फोर्ब्स इंडिया २०१९ च्या सेलिब्रेटी यादीमध्ये प्रियंका १४ व्या स्थानावर होती. त्यावेळी त्यांचे वार्षिक उत्पन्न २३.४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. २०१९ मध्ये, प्रियांका दोन चित्रपटांमध्ये दिसली जे ‘द स्काई इज पिंक’ आणि ‘इज नॉट इट रोमँटिक’ होती. यानंतर त्यांची संपत्ती आणखी वाढली.

सन २०२० मध्ये प्रियांकाची ही जादु टिकू शकली नाही. संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या चक्रात होते. यादरम्यान बॉलिवूड आणि हॉलिवूडला खूप त्रास सहन करावा लागला. त्याच वेळी अभिनेते आणि अभिनेत्रींनी जणू आपलं डोकं बडवुन घेतलं. त्यांचे मोठे नुकसान झाले. पण मार्च २०२१ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे सोना नावाचे भारतीय रेस्टॉरंट उघडले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा