[rank_math_breadcrumb]

बॉलिवूडमधील राजकारणापासून वाचण्यासाठी प्रियांकाची सावध भूमिका, करणार स्वतःच्या अटींवर काम

मधल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत चर्चेत आहे. एक तर तिची सिटाडेल ही सिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. आणि दुसरे कारण म्हणजे तिने बॉलिवूडबाबत केलेले तिचे वक्तव्य. सध्या प्रियांका भारतात असून ती इथे तिच्या सिरीजचे प्रमोशन करत आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंट दरम्यान तिने तिला बॉलिवूडमध्ये बॉयकॉट केले जाण्यावर भाष्य केले होते. तिच्या या बोलण्यावरून ती खूपच लाइमलाईट्मधे आली. प्रियंकाने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य करत तिला त्याचा कसा अनुभव आला ते सांगितले.

भारतात आल्यानंतर लगेच प्रियांका चोप्राने तिच्या आगामी थ्रिलर सिरीज असणाऱ्या ‘सिटाडेल’चे प्रमोशन सुरु केले आहे. यासाठी नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली. यावेळी बोलताना तिने अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले. तिने तिला बॉलिवूडमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना सांगितले की ती आता तिच्या नियम आणि तिच्या सोयीने काम करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने हे देखील स्पष्ट केले की, तिने आता तिचे सिद्धांत आणि तत्व बनवले असून, ती आता त्याच लोकांसोबत काम करणार जे तिला आवडतात. तिने हे देखील म्हटले की, “ज्या गोष्टींना घेऊन आपण तडजोड करू शकत नाही, ती आता खरी आहे. मी त्या लोकांसोबत काम करू शकत नाही जे मला आवडत नाही. माझ्या साठी ही कोणतीही तडजोड करता न येणारी बाब आहे.”

पुढे ती म्हणाली, “मला त्या लोकंचे कौतुक करायचे आणि त्यांना आवडून घ्यायचे त्यांच्यासोबत मला काम करायचे आहे. मला ते लोकं आवडतात जे माझ्या आसपास असतात. मी बऱ्याच काळापासून असे करत आहे. मी कामावर जाण्यासाठी उत्साहित राहू इच्छिते. मी कामावर जाण्यासाठी प्रेरित होऊ इच्छिते. आणि या गोष्टींसाठी मी तडजोड करू शकत नाही. यासाठी मी त्याच लोकांना भेटते ज्यांच्यासोबत मी काम करू इच्छिते.” प्रियांकाच्या या खुलाशानंतर आता ती खूपच सावध भूमिका घेत असल्याचे लक्षात येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा