मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न अवस्थेत फिरण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणावर अनेक राजकीय आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. त्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. यावर प्रियांका चोप्राने देखील संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री प्रियांकाने (Priyanka Chopra) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की,”या लाजिरवाण्या गुन्ह्याच्या 77 दिवसांनंतर, त्यावर कारवाई करण्यापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यामागे काय तर्क आहे? याचे कारण काय? काय आणि का, स्थिती आणि परिस्थिती विचारात न घेता, आपण कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही प्रकारच्या खेळातले प्यादे बनू देऊ शकत नाही.”
प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “ही घटना आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. मणिपूरच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. सर्वांनी मिळून आता फक्त एकाच गोष्टीसाठी एकत्रित आवाजात उठण्याची गरज आहे.” हि पोस्ट करताना तिने #togetherinshame आणि #justiceforthewomenofManipur या हॅशटॅगचा वापर केले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या प्रकरणी राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा सुरू आहे.
यादरम्यान, अभिनेता अक्षय कुमार, ऋचा चढ्ढा, आशुतोष राणा, रेणुका शहाणे, जया बच्चन, कियारा अडवाणी, संजय दत्त आणि रितेश देशमुख यांच्यासह सर्व कलाकारांनी मणिपूरमधील महिलांसोबत झालेल्या अत्याचाराचा निषेध केला आहे. या सेलिब्रिटींनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर उर्फी जावेदने विमानतळावर निषेध व्यक्त केला आहे. (Priyanka Chopra Shocking Statement On Manipur Viral Video)
अधिक वाचा-
–मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन; जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही
–‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर ‘या’ अभिनेत्रीने लावले ठुमके, लूक पाहून चाहते झाले वेडे