Sunday, April 14, 2024

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर ‘या’ अभिनेत्रीने लावले ठुमके, लूक पाहून चाहते झाले वेडे

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याच नेम नाही. सोशल मीडिया आणि कलाकरात यांचे तर फार जवळचे नाते तयार झाले आहे. कलाकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्याप्रमाणात उपयोग करतात. ते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ‘टिप टिप बरसा पानी‘ हे गाणं ऐकू येत आहे.

1994साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा‘ चित्रपटातील रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे खूप गाजल होत. या गाण्याला लोकांनी खूप पसंती दर्शवली. 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटासाठी हे गाणे रीक्रिएट करण्यात आले होते, ज्यामध्ये अक्षय कुमार होता, परंतु त्याच्या विरुद्ध कॅटरीना कैफ दिसली होती. या गाण्यातील कॅटरीनालाही लोकांनी पसंती दिली.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एमी एला (Amy Aela)याच गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. एमी एला ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिला सोशल मीडियावर कतरिनाची हुबेहुब काॅपी म्हटले जाते. हा व्हिडिओ नुकताच एमी एलाने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला होता, जो येताच व्हायरल झाला. उत्तम डान्सर एमीने तिच्या हॉटनेसने इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. एमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amy (@amyaela)

व्हिडिओमध्ये, कतरिना आणि रवीनाप्रमाणेच, एमी देखील पिवळ्या साडीमध्ये दिसत आहे. ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे, जो पाहून चाहत्यांचे काळजाचा ठोका चुकला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तिने ब्लडी डैडी, गोविंदा नाम मेरा, रनवे 34 सारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. (Actress Amy Ella beats Raveena Tandon and Katrina Kaif to ‘Tip Tip Barsa Paani’ song)

अधिक वाचा- 
“माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ संतप्त पोस्ट झाली व्हायरल
“शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं ??” मराठी अभिनेत्यांच्या राजकारणावरील ‘त्या’ पोस्टने उंचावल्या लोकांच्या भुवया

हे देखील वाचा