Thursday, September 28, 2023

मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन; जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही

बॉलीवूड चित्रपटांमध्ये देशाच्या सैनिकांची कहाणी अनेकदा दाखवली जाते. जिथे सिनेसृष्टीतील रसिकांनी आतापर्यंत ‘बॉर्डर‘, ‘लक्ष्य‘ यांसारख्या चित्रपटांमधून भारतीय सैनिकांची कथा पडद्यावर दाखवली गेली आहे. या चित्रपटानंतर मराठी चित्रपट सृष्टीत ‘फौज’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट मराठी रसिकांना मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार आहे. ‘फौज’ हा शब्द कानावर पडला तरी अंगावर शहारा येतो.

देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण आज या मायभूमीवर इथे सुरक्षित आहोत. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगण्यासाठी ‘फौज – द मराठा बटालियन’ (Fauji) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे.

स्वामी चरण फिल्म्स प्रस्तुत, निर्मित हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये फौजी सीमेवर देशाचे रक्षण करताना दिसत आहेच. देशाच्या अभिमानासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे सैनिक म्हणजे देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. या शूरवीर फौजींची विजयगाथा ‘फौज – द मराठा बटालियन’मधून प्रेश्रकांना बघायला मिळणार आहे.

दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, “मराठा बटालियन ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. इंग्रजांच्या काळातही ती होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानले जाते. या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक शौर्य गाजवले आहे. त्याच एका शौर्यकथेमधील एक गोष्ट ‘फौज द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे आम्ही मांडतोय.” चित्रपटाचे पोस्ट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उसुक्ता वाढली आसल्याचे दिसत आहे. (‘Fauz’ The Maratha Battalion movie poster release will tell the heroic story of Maratha heroes)

अधिक वाचा- 
‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर ‘या’ अभिनेत्रीने लावले ठुमके, लूक पाहून चाहते झाले वेडे
“माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ संतप्त पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा