Wednesday, September 23, 2026
Home भोजपूरी सलमान-करिश्माच्या ‘पल्लू सरका जाये’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्रीचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

सलमान-करिश्माच्या ‘पल्लू सरका जाये’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्रीचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

भोजपुरी चित्रपट सृष्टीमधील क्वीन प्रियांका पंडित तिच्या डान्स स्टेपमुळे लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिच्या डान्समुळे तिला सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असतात. तिच्या चाहत्यांना देखील तिचा डान्स खूप आवडतो आणि ते तिला नेहमीच तिच्या डान्ससाठी प्रोत्साहन देत असतात. असाच आणखी एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका बॉलिवूडमधील ‘पल्लू सरका जाये’ या गाण्यावर जबरदस्त डान्स स्टेप करताना दिसत आहे.

हे गाणे बॉलीवूड मधील सुपरहिट अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूरच्या ‘दुल्हन हम ले जायेंगे’ चित्रपटातील आहे. त्यांचा हा चित्रपट त्यावेळी खूपच गाजला होता. या चित्रपटातील पल्लू सरका जाये हे गाणे दिग्गज गायिका अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलेले आहे.

प्रियांका पंडितने या गाण्यावरील तिचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, तिने निळ्या रंगाची साडी आणि पांढर्‍या रंगाचा ब्लाउज घातला आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमधील तिच्या एक्सप्रेशने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे चाहते तिच्या या व्हिडिओला कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एका चाहत्याने तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “किती छान झालं असतं, जर माझं घर तुझ्या घराशेजारी असलं असतं.” तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तू साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.”

प्रियांका पंडित सोशल मीडियावरील तिचे डान्स व्हिडिओ आणि फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. याआधी देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने गिप्पी ग्रेवाल यांच्या ‘हाय हाय तेरा रंग गुलाबी’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावले होते. या सोबतच तिने एक कॅप्शन दिले होते की, “जर तुमचे चारित्र्य तुमच्या कपड्यांवरून ठरत असेल, तर कपड्याच्या दुकानाला मंदिरच म्हटलं पाहिजे.” तिच्या या डान्सपेक्षा ती तिच्या कॅप्शनमुळे सर्वत्र चर्चेत होती. इंस्टाग्रामवर तिचे मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग असल्यामुळे तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ लगेच व्हायरल होत असतो.

हे देखील वाचा