जीतेंद्र यांची पत्नी अन् लेक जाणार खडी फोडायला? बिहारच्या न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

0
115
Jeetendra-And-Ekta-Kapoor-And-Shobha-Kapoor
Photo Courtesy: Instagram/ektarkapoor

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते जीतेंद्र यांची लेक आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर तसेच त्यांची पत्नी शोभा कपूर अडचणीत सापडल्या आहेत. या मायलेकींविरुद्ध बिहारच्या बेगुसराय येथील एका न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. हे वॉरंट एकता कपूरच्या XXX या सीरिजशी संबंधित आहे. कारण, काही लोकांनी या शोविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

खरं तर, XXX ही एक वेबसीरिज आहे, जी निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) हिच्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाऊ शकते. चला तर नेमंक प्रकरण काय आहे जाणून घेऊया…

एकता कपूरविरुद्ध जारी झाले अटक वॉरंट
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्याविरुद्ध बेगुसराय येथील एका न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. या दोघींवर जवानांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. न्यायालयाच्या वतीने न्यायाधीश विकास कुमार यांनी हे वॉरंट जारी केले आहे.

एकताच्या XXX वेबसीरिजविरुद्ध तक्रार दाखल
एकताच्या या XXX या वेबसीरिजविरुद्ध माजी सैनिक शंभू कुमार यांनी तक्रार केली होती. 2020मध्ये दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत शंभू यांनी म्हटले होते की, XXX नावाच्या वेबसीरिजमध्ये असे अनेक वादग्रस्त सीन आहेत, जे एका सैनिकाच्या पत्नीशी संबंधित आहेत. न्यायालयाने एकता आणि तिच्या आईला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एकतानेही न्यायालयाला सांगितले आहे की, ज्या सीनमुळे समस्या होती, त्यामधील बरेच सीन वेबसीरिजमधून काढून टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा- नेहा कक्करशी वाद सुरू असतानाच फाल्गुनीसोबत नवरात्री साजरी करण्यासाठी पोहोचली रश्मिका, म्हणाली…

एकताची कारकीर्द
एकता कपूर हिने लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नाव कमावले आहे. तिने प्रोड्युस केलेल्या कार्यक्रम आणि सिनेमांमध्ये ‘मानो या ना मानो’, ‘इतिहास’, ‘कुंडली’, ‘कोशिश- एक आशा’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुटुंब’, ‘कितने कूल हैं हम’, ‘रागिनी एमएमएस’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘शूटआऊट ऍट वडाला’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मानलं पाहिजे राव! पाय फ्रॅक्चर होऊनही शिल्पा गरबा काय सोडायची नाय, जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहाच
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! लेक पलकमुळे कंगाल झाली श्वेता तिवारी, व्हिडिओतून झाला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here