Thursday, April 25, 2024

बालाजी टेलिफिल्म्सने वाढवला नाही एकता अन् शोभा कपूरचा पगार, कारण…

बालाजी टेलिफिल्म्सच्या भागधारकांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक शोभा कपूर आणि सहव्यवस्थापकीय संचालक एकता कपूर यांचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. बालाजी टेलिफिल्म्सने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) शेअरधारकांकडून वाढीसाठी दोन असाधारण प्रस्तावांना आवश्यक मान्यता मिळू शकली नाही.

दोन्ही ठरावांच्या बाजूने टाकलेल्या मतांपेक्षा प्रस्तावाच्या विरोधात जास्त मते पडली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ज्यामुळे ठराव पास होऊ शकले नाही. कंपनीने सांगितले की, भागधारकांनी मात्र ११ फेब्रुवारी, २०२१ पासून सलग ५ वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यासाठी इतर ठराव पारित केले आहे. (Balaji Telefilms did not increase Ekta Kapoor’s salary, know why)

नियमांनुसार, एजीएममध्ये ७५ टक्के मते कोणताही असाधारण ठराव पास करण्यासाठी आवश्यक असतात. बालाजी टेलिफिल्म्सच्या व्यवस्थापकीय संचालक शोभा कपूर यांना १० नोव्हेंबर, २०२१ पासून पुढील २ वर्षांसाठी मोबदला मंजूर करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने केवळ ४३.२३ टक्के मते मिळाली, तर ५६.७६ टक्के मते त्याच्या विरोधात होती. त्याच वेळी, कंपनीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर यांच्या प्रस्तावाच्या बाजूने ४४.५४ टक्के मते पडली, तर ५५.४५ टक्के मते प्रस्तावाच्या विरोधात मिळाली होती.

याच दरम्यान, जेसन कोठारी यांच्या नियुक्तीचा तिसरा असामान्य प्रस्ताव ९९.७७ टक्के मतांनी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांना एकूण २.०९ कोटी रुपये पगार मिळाला आहे. ज्यात ७.६२ लाख रुपयांच्या इतर गरजांसह १.९५ कोटी रुपये वेतन समाविष्ट आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बालाजी टेलिफिल्म्समध्ये एकूण २४.९१ टक्के हिस्सा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-दान देताना फोटो काढणाऱ्या कलाकारांवर भडकला रोहित शेट्टी; म्हणाला, ‘फोन करून बोलवल्याशिवाय…’

हे देखील वाचा