Thursday, September 28, 2023

सागर किनारे! मालदीवमध्ये समुद्राला पाहून रोमॅंटिक झाली ‘ही’ एव्हरग्रीन जोडी, लेकीने शेअर केला क्युट व्हिडिओ

मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया. मागील अनेक दशकांपासून ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. सध्या सचिनजी जरी अभिनयात कमी दिसत असले तरी सुप्रियाजी मात्र हिंदी आणि मराठीमध्ये कमालीच्या सक्रिय आहेत. तर या दोघांची एकुलती एक मुलगी असलेली श्रिया तर हिंदी वेबसिरीज इंडस्ट्रीमधील मोठे नाव.

सचिन, सुप्रिया आणि श्रिया हे तिघे सध्या त्यांची अतिशय सुंदर अशी कौटुंबिक ट्रिप एन्जॉय करत आहे. तिघेही मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत असून, त्यांच्या या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. श्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. यातच एक व्हिडिओ देखील आहे. हा व्हिडिओ सध्या कमालीचा गाजत असून लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

श्रियाने तिच्या अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सचिन आणि सुप्रिया ही जोडी अथांग अशा निळ्याशार समुद्रासमोर बसलेली दिसत असून गाणी म्हणण्याचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसते की ते, दोघं ‘सागर किनारे..दिल ये पुकारे..’ हे गाणे गात असून, मागून श्रिया येत त्यांच्या या गाण्याचा व्हिडिओ शूट करताना दिसते. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंटचा पाऊस पडला असून, त्यांच्या केमिस्ट्रीची कमालीची चर्चा आजही होत असते.

दरम्यान सचिन आणि सुप्रिया या जोडीने मराठीमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले असून, सचिन यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट, मालिकांचे दिग्दर्शन केले आहे तर सुप्रिया यांनी अनेक हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये सरस भूमिका केल्या आहेत.

अधिक वाचा- 
‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

हे देखील वाचा