×

प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केला शोक व्यक्त

पद्मश्री पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांचे निधन झाले आहे. मिलेना यांनी (मंगळवारी) २६ जानेवारी रोजी या जगाचा निरोप घेतला. मिलेना यांच्या निधनानंतर सोशल मीडिया युजर्स त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून मिलेना यांची आठवण काढत शोक व्यक्त केला आहे.

इटलीमध्ये जन्मलेल्या साल्विनी नियमितपणे भारतात, विशेषत: केरळमध्ये येत असे. केरळमध्येच त्या कथकली शिकल्या आणि पॅरिसमध्ये ‘सेंटर मंडप’ या भारतीय नृत्य प्रकारांसाठी शाळा चालवली. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

बुधवारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “सुश्री मिलेना साल्विनी यांना भारतीय संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या उत्कटतेसाठी कायम स्मरणात ठेवले जाईल. संपूर्ण फ्रान्समध्ये कथकली अधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मी त्यांच्या निधनाने दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि शुभचिंतकांबरोबर मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले की, “पद्मश्री सुश्री मिलेना साल्विनी, कथकलीच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक, यांचे काल निधन झाले. पॅरिसमधील “सेंटर पॅव्हेलियन” च्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी भारतीय नृत्य आणि संगीताचा प्रचारात चार दशकांहून अधिक काळ घालवला आहे, मनापासून शोक.”

Kathakali patron Milena Salvini passes away, PM Modi condoles demise of Padma Shri winner | Milena Salvini Kathakali| Kerala Kalamandalam| Kathakali Artist Passes Away

उपराष्ट्रपती वेन्हैय्या नायडू यांनीही साल्विनी यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “सुश्री मिलेना साल्विनी यांचे निधन झाल्याचे कळून दु:ख झाले. कथकली वादक, सुश्री मिलेना साल्विनी यांनी चार दशकांहून अधिक काळ फ्रान्समध्ये भारतीय नृत्य आणि संगीताचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

PM Modi expresses anguish at passing away of French Kathakali dancer Milena Salvini

 

माध्यमांतील वृत्तानुसार, १९६२ मध्ये दोन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर साल्विनी केरळ कलामंडलममध्ये कथकली शिकल्या. नंतर त्यांनी पॅरिसमध्ये नृत्यशाळा उघडली.

हेही वाचा  :

Latest Post