×

‘या’ अभिनेत्रीसोबतब्रेकअप झाल्यावर विक्रम भट्ट यांनी मारली होती इमारतीवरून उडी, पुढे झाले असे…

हिंदी सिनेसृष्टीत असे दिग्दर्शक आहेत जे आपल्या चित्रपटाइतकेच वैयक्तिक आयुष्याबद्दलही सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत. यांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक विक्रम भट्ट. विेक्रम भट्ट हे चित्रपट क्षेत्रातील एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. सिनेसृष्टीत त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे मात्र विक्रम भट्ट हे आपल्या चित्रपटांपेक्षा प्रेम प्रकरणांमूळे खूपच चर्चेत राहिले आहेत. अशातच ते गुरुवारी (२७ जानेवारी) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांचा प्रवास.

विक्रम भट्ट (vikram bhatt) यांचा जन्म २७ जानेवारी १९६९ रोजी मुंबई येथे झाला. हिंदी सिनेसृष्टीला भयपटांची भेट देणारे पहिले दिग्दर्शक म्हणून विक्रम भट्ट यांचे नाव प्रथम घेतले जाते. त्यांनी आपल्या दिग्दर्शनात अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. ते हिंदी चित्रपटक्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्याकाळात प्रेक्षकांना भयपटांची आवड त्यांच्यामुळेच निर्माण झाली, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. वयाच्या फक्त १४ व्या वर्षापासून त्यांनी चित्रपटक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ते एक यशस्वी निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेतेसुद्धा होते. मात्र त्यांनी अभिनयक्षेत्राला सुरुवातीपासूनच लांब ठेवले होते.

Vikram Bhatt - Wikipedia

विक्रम भट्ट यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती केली. मात्र चित्रपटांपेक्षा जास्त ते आपल्या प्रेमप्रकरणांमुळेच सर्वत्र चर्चेत राहिले. ते अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत खूप काळ रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत याबद्दल बोलताना विक्रम भट्ट यांनी सांगितले की, “माझं सुष्मिता सेनवर जिवापाड प्रेम होते. जेव्हा तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी खूप व्यतीत झालो होतो.” इतकेच नव्हेतर त्यांनी आपल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र सुदैवाने ते बचावले. सुष्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांच्या नात्याची खूप काळ चर्चा सुरू होती, ज्यामुळे त्यांना घटस्फोट घ्यावा लागला. त्याचबरोबर ते अभिनेत्री अमिषा पटेलसोबतही दिर्घकाळ रिलेशनमध्ये होते. २००५ मध्ये आलेल्या ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ चित्रपटावेळी त्यांची अमिषा पटेलसोबत ओळख झाली. दोघांचही पाच वर्ष हे प्रेमप्रकरण सुरू होते. शेवटी अमिषा पटेलसोबतही त्यांचे ब्रेकअप झाले.

Vikram Bhatt opens up on his extramarital affair with Sushmita Sen

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “मला माझ्या पत्नीला आणि मुलांना सोडल्याचे दुःख आहे. माझ्यामधे अदितीला काही सांगायची हिंमत नव्हती. अनेक वाईट घटना त्याकाळात घडल्या मात्र मला वाईट वाटत की, मी परिस्थिती हाताळू शकलो नाही. त्यावेळी जर मी कमी पडलो नसतो तर आज स्थिती काहीशी वेगळी असती.”

Vikram Bhatt says Shwetambari Soni 'stole his heart away', uncle Mahesh  Bhatt confirms their secret wedding | Entertainment News,The Indian Express

 

दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी मागच्या वर्षी आपली गर्लफ्रेंड श्वेतांबरी सोनीसोबत लग्न केले. दोघेही दिर्घकाळ एकमेकांच्या प्रेमात होते. या लग्नाची बातमी लपवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला मात्र शेवटी ही बातमी समोर आली.

हेही वाचा :

Booby Deol Bday Special : डिप्रेशनचा शिकार झाला होता बॉबी देओल, सल्लू भाईने केली होती अशाप्रकारे मदत

सिमेंटच्या पाईपमध्ये झोपून अजित खान यांनी काढल्या अनेक रात्री, पुढे खलनायक बनून गाजवली सिनेसृष्टी

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत चालू आहे अप्पू शाशंकच्या लग्नाचा सोहळा, अप्पूच्या लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Latest Post