Pushkar jog bapmanus |मित्रांनो सध्या अनेक मराठी चित्रपट गाजत आहेत त्यातीलच अभिनेता पुष्कर जोग याचा ‘बापमाणूस’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे अनेक जण हा चित्रपट पाहून पाहून झाले आहेत. या चित्रपटाची कथा एका बाप आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे एका मुलासाठी बाप काय काय करू शकतो याची संपूर्ण कथा या चित्रपटात दाखवलेली आहे.
सध्या मराठीमध्ये वेड, झिमा, वाळवी, बाई पण भारी देवा, या चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता पुष्कर जोगच्या (Pushkar jog) बाप माणूस या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आत्ता जरी चित्रपट चांगले चालत असले तरी मराठी चित्रपटांना स्क्रीनस मिळत नाही ही तक्रार अजूनही कायम आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक भन्नाट चित्रपट होऊन गेलेले आहेत परंतु केवळ चित्रपटांना थेटरमध्ये स्क्रीनस न मिळाल्याने प्रेक्षकांपर्यंत तो चित्रपट पोहोचला नाही.
याच गोष्टीची खंत मराठी मधून सृष्टीतील सगळ्यात कलाकारांना आहे परंतु आता बाप माणूस या चित्रपटामुळे चर्चेत आलेला पुष्कर यांनी या सगळ्या परिस्थितीवर त्याचे मत व्यक्त केले आहे. या आधी भाऊराव कराडे यांच्या टीडीएम या चित्रपटाला थेटर स्क्रीन मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार अक्षरशः रडले होते. याच गोष्टीची खंत घेत पुष्कर जोगने त्याचे मत व्यक्त केली आहे.
याबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणाला की, “हे खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रात असून मराठी सिनेमांन थेटर्स साठी भिका मागे लागतात. तसेच आपले राजकारणी सांस्कृतिक खातं बघणारे मंत्री यांनी देखील याकडे लक्ष द्यावे यावर एकच उपाय आहे सर्व निर्मात्यांनी एकत्र येऊन एकता दाखवली तरच हे शक्य होणार आहे.”
या आधी पुष्कर जोगने ‘विक्टोरिया’ हा सिनेमा काढला होता परंतु या सिनेमाला देखील स्क्रीन न मिळाल्याने हा सिनेमा पुढे ढकलावा लागला होता याबद्दल देखील त्याने भाष्य केले. त्याचे हे म्हणणे अनेकांना पटत आहे. त्याचा बापमाणूस हा सिनेमा नुकताच रिलीज झालेला आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना त्याचीही भूमिका खूप आवडली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुषा दांडेकर ही मुख्य भूम घेत आहे तर केया या बाल अभिनेत्रीने एका चिमुकलीचे पात्र साकारले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
Amruta khanvilkar husbund | ‘आमचं नातं खूप चांगलं असतं पण…’ अमृता खानविलकरने सांगितली पतीबद्दल ‘ती’ गोष्ट
Atisha naik | अतिशा नाईक यांनी सांगितला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव, म्हणाल्या; ‘मी आधी बाबांना सांगितलं’