Saturday, April 20, 2024

‘कुत्र्याचे नशीब खूप चांगले आहे’, म्हणत नेटकऱ्यांनी केल्या रश्मिका मंदानाच्या फोटोवर कमेंट्स

दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) लवकरच अल्लू अर्जुन (Allu Arjun) सोबत दिसणार आहे. ‘पुष्पाः द राइज’ हा रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांचा पहिलाच चित्रपट असून, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटाचे पोस्टर आणि पोस्टरवर दिसत असलेला रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट चंदनाची तस्करी करणाऱ्या लोकांवर आधारित असून, सुकुमार (sukumar) यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

सध्या रश्मिकाचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका आणि तिचा कुत्रा दिसत आहे. रश्मिका शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे कित्येक दिवस घरी जात नाही. मात्र जशी तिची शूटिंग संपते तशी ती घराकडे धाव घेते. रश्मिका बऱ्याच दिवसांनी घरी आली आणि तिच्या कुटुंबातील सर्वात आवडत्या आणि क्युट व्यक्तीला सर्वप्रथम भेटली. रश्मिका घरात शिरल्या शिरल्या तिच्या कुत्र्याला भेटते. तिने तिच्या कुत्र्यासोबत सोशल मीडियावर वर एक फोटो शेअर केला असून, यात ती तिच्या कुत्र्याला किस करताना दिसते. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘वेलकम होम किसीज.. मी परत आले..’ असे लिहिले आहे.

या फोटोवर संगीतकार आनंद शर्मा यांनी(Anand Sharma) ‘परफेक्ट कपल’ अशी कमेंट केली आहे. या कमेंटमुळे युजर्स आनंद शर्मा यांना खूप ट्रोल करत आहे. रश्मिकाच्या या फोटोवर युजर्सने चांगल्या वाईट अशा सर्वच प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी तर ‘कुत्र्याचे नशीब खूप चांगले आहे’ असे देखील म्हटले आहे.

रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन वेगळ्या वेषभूषांमध्ये दिसत आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला रिलीज होणार असून, यात रश्मिका एका मासे विकणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अल्लू अर्जुन चंदन तस्करी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे.

चित्रपटामध्ये समंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) ही देखील एका विशेष भूमिकेमध्ये दिसणार आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी समंथाची झलकही दाखवली होती. या चित्रपटाची वाट देशभरातील प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा