‘पुष्पा: द राईज‘ या सिनेमाला प्रदर्शित होऊन आता जवळपास 1 वर्षे उलटले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ या सिनेमाला भारतातच नाही, तर परदेशातूनही प्रेम मिळाले. विशेष म्हणजे, या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. आता हा सिनेमा रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच रशियन लोकांवरही ‘पुष्पा’चा फिव्हर चढताना दिसत आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या आहेत.
सिनेमा रिलीजपूर्वीच व्हिडिओ व्हायरल
झाले असे की, रशियामध्ये ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही रशियन महिला ‘सामी सामी’ (Saami Saami) गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत महिला मॉस्कोच्या रेड स्क्वेअर येथील स्टेट हिस्टोरिकल म्युझिअमसमोर थिरकत आहेत. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत कौतुकाचे पूलही बांधले.
View this post on Instagram
‘पुष्पा: द राईज’ हा सिनेमा 8 डिसेंबर रोजी रशियामध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा मागील वर्षी भारतात रिलीज झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना रशियात पोहोचले आहेत. मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर) त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. अल्लू अर्जुन याने पोस्ट शेअर करत “पुष्पा इन रशिया”, तर रश्मिकाने “रशियावरून प्रिवेट, पुष्पा द राईज, मॉस्कोतील पहिला दिवस” असे लिहिले आहे.
PUSHPA ???????? IN RUSSIA ???????? pic.twitter.com/otf4opQ6ZJ
— Allu Arjun (@alluarjun) November 30, 2022
Privyet from Russia ❤️????
Pushpa the rise
Day 1- Moscow! @alluarjun @aryasukku @ThisIsDSP @MythriOfficial pic.twitter.com/HAOjMsVEfo— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 30, 2022
चाहत्यांना दुसऱ्या भागाची प्रतीक्षा
सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘पुष्पा: द राईज’नंतर चाहत्यांना ‘पुष्पा: द रूल’ (Pushpa: The Rule) या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागली आहे. या सिनेमाची शूटिंग सध्या सुरू आहे. तसेच, हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. (pushpa the rise russian women dance On allu arjun rashmika mandanna song sami sami see video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘सिद्धू दादा लव्ह यू’, सिद्धार्थ जाधवच्या ऍक्टिंगचा रणवीरही बनला फॅन; चाहत्यांना म्हणाला, ‘सिनेमा पाहाच’
फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या नोरासोबत अश्लील कृत्य, घडला प्रकार व्हिडिओत कैद