Thursday, April 25, 2024

कडकच ना! अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, पाहायला मिळाली रश्मिकाची बोल्ड स्टाईल

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) जेव्हाही त्याचा चित्रपट घेऊन येतो, तेव्हा त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या अल्लू त्याच्या आगामी ‘पुष्पा- द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक झलकने चित्रपटगृहात ‘पुष्पा’ पाहण्यासाठी करोडो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. निर्मात्यांनी ३ डिसेंबर रोजी बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करून ट्रेलर उघड करण्याची घोषणा केल्यापासून, #pushpatherise हा हॅशटॅग ट्विटरवर सतत ट्रेंड करत आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. कारण, निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. त्याबद्दल सकाळी सांगितले होते की, तो शुक्रवारी (३ डिसेंबर) संध्याकाळी ६.३० वाजता प्रदर्शित होईल आणि त्याची लिंक ठरलेल्या वेळेनुसार आली आहे.

‘पुष्पा’चा नवीन ट्रेलर अल्लूच्या बॅक साईडने सुरू होतो आणि त्यानंतर त्यात एक विषारी साप दिसतो. व्हिडिओमध्ये अल्लू पाण्यात बाईक स्टंट करताना दिसत आहे, तर रश्मिकाची बोल्ड स्टाईल दिसत आहे. यामध्ये अभिनेते चंदनाची तस्करी केल्यानंतर त्यांचा स्वॅग दाखवताना दिसत आहेत. शुक्रवारी (०३ डिसेंबर) सकाळपासून लाखो लोक ‘पुष्पा’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आता सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. या ट्रेलरला आतापर्यंत ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अल्लू व्यतिरिक्त या चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शुक्रवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे, ज्यामध्ये अल्लूचा लूक मागील पोस्टरपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत आहे. नवीन पोस्टरमध्ये अभिनेता खूपच स्टायलिश दिसत आहे, तर मागील लूकमध्ये तो एक भयानक तस्कराच्या रूपात दिसला होता. हा चित्रपट तेलुगू भाषेत बनवला आहे, जो आता तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे.

‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट १७ डिसेंबर, २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट के सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा चित्रपट मैथ्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार झाला आहे. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू एका खास भूमिकेत दिसणार आहे, ज्याचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी निर्मात्यांनी प्रेक्षकांना समंथाची झलकही दाखवली आहे.

आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय कमाल दाखवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसता राडा! जगभरात गाजतोय मोहनलाल यांचा ‘मरक्कर’, पहिल्याच दिवशी यूएईत कमावले कोट्यवधी रुपये

-कंगना माफी मांगो, अभी के अभी…! अखेर माफी मागितल्यावरच झाली अभिनेत्रीची सुटका; पाहा कुठे घडला ‘हा’ प्रकार

-याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी

हे देखील वाचा