राहुल आणि दिशाची लगीन घटिका आली जवळ, जोडप्याचा संगीत परफॉर्मन्सचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल


‘बिग बॉस’ फेम अभिनेता राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लगीन घटिका जवळ आली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांना लग्नाच्या कपड्यांमध्ये बघण्यासाठी त्यांचे चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते दोघे त्यांच्या संगीत परफॉर्मन्सचा सराव करताना दिसत आहेत. तसेच ते दोघे त्यांच्या सोलो परफॉर्मन्सचा देखील सराव करताना दिसत आहेत.

दोघेही साध्या पोशाखात दिसत आहेत. दिशाने फ्लोरल ड्रेस आणि शॉर्ट जॅकेट घातले आहे. तसेच राहुल शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. (Rahul vaidya and disha Parmar practices for their sangeet performance, video get viral)

त्या दोघांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद आणि उत्साह दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर त्यांचे चाहते कपलगोल अशी कमेंट करत आहेत. कोणी सुपर एक्साएटेड लिहित आहे, तर एकाने या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला चालू असणाऱ्या गाण्यावर कमेंट करत लिहिले आहे की, हे गाणे राहुलचा मित्र अली गोनीचे आहे.

याव्यतिरिक्त आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातही ते संगीत रिहर्सल करताना दिसत आहेत. यादरम्यान बॅकग्राऊंडला ‘नचदे ने सारे’ हे गाणे वाजत आहे.

नुकतेच राहुलने त्याच्या लग्नाच्या चाललेल्या तयारीबाबत सांगितले होते की, त्याने अजून लग्नाचा ड्रेस फायनल केला नाही. राहुल काही दिवसांपूर्वी ‘खतरों के खिलाडी’ या शोची शूटिंग पूर्ण करून आला आहे. त्याने सांगितले की, “दिशाने लग्नाचा ड्रेस फायनल केला आहे. परंतु मी अजूनही कोणताही ड्रेस फायनल केला नाही. मला लवकरात लवकर ठरवायला पाहिजे. नाहीतर मला टी-शर्ट आणि जीन्समध्ये लग्न करावे लागेल.”

यावेळी त्याने सांगितले की, “सर्वात महत्वाचे काम राहिले आहे. ते म्हणजे लग्नाची पत्रिका. मी अजूनही मित्रांना आणि नातेवाईकांना लग्नाची पत्रिका दिली नाही. मला हे काम लवकर करायचे आहे. कारण लग्नाला खूप कमी वेळ राहिला आहे.”

मागच्या वर्षी दिशाच्या वाढदिवशी राहुलने बिग बॉसच्या घरात तिला लग्नाची मागणी घातली होती. त्याने एका टी-शर्टवर लिहिले होते, “दिशा माझ्याशी लग्न करशील का??” यावेळी त्याने शोच्या निर्मात्यांना विनंती केली होती की, दिशाकडून जे काही उत्तर येईल ते त्याच्यापर्यंत पोहोचवा. जेव्हा दिशा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी बिग बॉसच्या घरात गेली होती, तेव्हा‌ तिने टेलिव्हिजनवर सर्वांसमोर त्याचे प्रपोज स्वीकारले होते.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच राहुलचे ‘अली’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तो जेव्हा बिग बॉसच्या घरात होता, तेव्हा त्याने हे गाणे लिहिले होते. तो काही दिवसांपूर्वी ‘खतरों के खिलाडी’ या शोची शूटिंग पूर्ण करून परत आला आहे.

दिशा ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ आणि ‘वो अपना सा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


Leave A Reply

Your email address will not be published.