वयाच्या ४१ व्या वर्षीही रायमा सेन आहे एकदम हॉट; बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा


अभिनेत्री रायमा सेन ही तिच्या सौंदर्यामुळे मागील दोन दशकांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन सेन्सने ती सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. यासोबत चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे ती नेहमीच कौतुकास पात्र ठरते. तिच्या फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिचे बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतेच तिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.(Raima Sen’s bold photo viral on social media)

रायमा सेनने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिने थाय लेंथ ड्रेस घातला आहेत. या फोटोमध्ये वी कट नेक पोटापर्यंत आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तसेच तिने अत्यंत बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिचे चाहते सोशल मीडियावर या फोटोला खूप प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर तिचे खूप फॅन फॉलोविंग आहे. तिला बंगालमधील ‘मोनालिसा’ म्हणतात. ही गोष्ट अनेकांना माहिती नसेल की, बंगालची ही हॉट मोनालिसा 41 वर्षाची आहे. पण तिच्याकडे बघून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

तिने बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. पण बंगालमध्ये तिने जास्त काम केले आहे. रायमाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिची ‘लास्ट आवर’ ही वेब सीरिज ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार आहे. यामध्ये ती एका आईच्या रुपात आहे. या सीरिजमध्ये संजय कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

बंगाली चित्रपटासोबत ती वेब सीरिजमध्ये देखील खूप व्यस्त आहे. झी 5 वर तिने ‘परछाई’, ‘लव्ह बाईट्स’, ‘ब्लॅक विडोज’, ‘फॉरबिडन लव्ह’ यांंसारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने ‘चोखेरबाली’, ‘फंटूश’, ‘परिनिता’, ‘दस’, ‘अंडर’, ‘तीन पत्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.