Saturday, January 28, 2023

‘सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज…,’ प्रसाद ओकने पत्नीच्या यशासाठी सोशल मीडियावर केले भरभरून कौतुक

अभिनेता प्रसाद ओक हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. त्याच्या पत्नीसोबत अनेकवेळा फोटो शेअर करून तो त्याच्या पत्नीवर प्रेम दर्शवत असतो. अशातच त्याच्या पत्नीने म्हणजेच मंजिरी ओकने एक अभिमानास्पद कामगिरी आहे. त्यानिमित त्याने तिचे अभिनंदन करण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. मंजिरी

अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक ही एक व्यावसायिका आहे. ती नेहमी विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करत छोट्या उद्योजकांना मदत करत असते. पण आता तिच्या याच कामामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे यामुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. नुकतंच एका नथीला मंजिरी ओकचे नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे ती नथ आता ‘मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाणार आहे. प्रसाद ओकने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (prasad oak share a post to congratulate to his wife)

प्रसाद ओकने तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “प्रिय मंजू
आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी, या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय… आज एका ‘नथी’ला तुझं नाव लागलंय. ‘मंजिरीनथ’ आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली… तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत. या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस, याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम.”

त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक कलाकार या पोस्टवर कमेंट करून तिला अभिनंदन करत आहेत. यामुळे मंजिरी सर्वत्र चर्चेत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा