राज कुंद्राला पाहताच भडकली शिल्पा; म्हणाली, ‘तू माझ्या परिवाराला बदनाम केलंस आणि माझं करिअर…’


मागच्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा तुफान गाजत आहे. २० जुलैला राज कुंद्राला अश्लील चित्रपटाप्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेमुळे बॉलिवूडसोबतच उद्योग जगतात एकच खळबळ माजली. राजच्या अटकेनंतर या पॉर्नोग्राफी प्रकरणात अनेक वेगवेगळ्या प्रकरणांचा उलगडा झाली, काही गुपितंही समोर आली. या सर्व गोष्टींमध्ये २३ जुलैला राज आणि शिल्पाची त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर दोघांना समोरासमोर बसवून कसून चौकशी देखील करण्यात आली. या सर्व घटनेमध्ये पोलीस राज कुंद्राची कसून चौकशी करत असून, त्याच्या ऑफिससोबतच घराचीही झडती घेतली गेली. राज कुंद्राच्या विरोधात पोलिसांना अनेक पुरावे सापडले असून त्यांनी काही वस्तू जप्त देखील केल्या आहेत.

Photo Courtesy: Instagram/theshilpashetty

प्राप्त माहितीनुसार जेव्हा पोलीस राजला त्याच्या घरी चौकशीसाठी घेऊन गेले, तेव्हा राज कुंद्राला पाहून शिल्पा शेट्टीचा संताप अनावर झाला आणि पोलिसांसमोरच ती राजवर जोरजोरात ओरडू लागली. “आपल्याकडे सर्व काही असताना हे सर्व करण्याची काय गरज होती?” असा प्रश्न देखील तिने राजला विचारला. सोबतच ती म्हणाली की, राज कुंद्राच्या या केसमुळे तिच्या करिअरवर देखील मोठा परिणाम झाला असून, तिच्या हातून अनेक मोठ्या जाहिराती आणि काही डील्स निसटल्या आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबाची देखील मोठी बदनामी झाली आहे. हे सर्व बोलत असताना शिल्पा मोठमोठ्याने रडत देखील होती. (raj kundra pornography case shilpa shetty breaks down shouted at raj kundra)

photocourtesy:google

जर राज असे काही करत होता, तर त्याने तिला या सर्वांची कल्पना का नाही दिली? असे सिनेमे, ऍप याबद्दल नेहमीच तिला अंधारात का ठेवले? असे देखील ती म्हणाली होती. यासर्व आरोपांवर तो शिल्पाला फक्त हेच सांगत होता की, त्याने पॉर्न सिनेमा बनवले नसून इरॉटिक सिनेमे बनवले आहेत. शिल्पाने तिच्या चौकशी दरम्यान तिला या प्रकरणातले काहीही माहिती नसल्याचे सांगत, राजही निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

photocourtesy: instagram; theshilpashetty

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व प्रकरणात शिल्पाचा हात असल्याचे अजून कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तिच्या आता झालेल्या चौकशीनंतर पुन्हा चौकशीची शक्यता खूप कमी आहे. दरम्यान राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.