Friday, March 29, 2024

‘सुपरस्टार होऊन कसे वाटते?’ राजेश खन्नांच्या या प्रश्नावर अमिताभ यांनी दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार हे बिरुद मिळवणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. असे नेहमीच म्हटले जाते की, जे स्टारडम राजेश खन्ना यांनी अनुभवले ते आजतागायत कोणालाच अनुभवता आले नाही. एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. त्यांना साईन करण्यासाठी प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्या त्यांच्या घराबाहेर लाईन लावून उभे राहायचे. ज्या सिनेमात राजेश खन्ना, तो सिनेमा हिट हे प्रदर्शनाआधीच ठरलेले असायचे. इंडस्ट्रीमध्ये असेही म्हटले जायचे की, ‘उपर आका नीचे काका.’ त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. पैसाही खूप कमावला. मात्र म्हणतात ना हाताची पाचही बोटं एकसारखी नसतात, तसेच उजाडणारा प्रत्येक दिवस सारखा असेलच असे नाही. राजेश खन्ना यांच्याबाबतीतही असेच झाले. ठराविक काळानंतर राजेश खन्ना यांचा शिक्का चालणे जवळपास बंदच झाले आणि अमिताभ बच्चन यांचा उदय होण्यास सुरुवात झाली. जेव्हा अमिताभ बच्चन यांना सिनेमात काम करताना राजेश खन्ना यांनी पाहिले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की अमिताभ सुपरस्टार होणार.

photocourtesu : google amitabh rajesh khanna

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी ‘आनंद’ सिनेमात सोबत काम केले. हा सिनेमा सुपरहिट झाला. अमिताभ यांचा सहजसुंदर अभिनय पाहून प्रेक्षकांसोबतच खुद्द राजेश खन्ना यांना देखील त्यांचा अभिनय आवडला होता. हळूहळू इंडस्ट्रीचे चित्र बदलायला लागले आणि राजेश खन्ना यांचे वर्चस्व कमी होत, अमिताभ यांना महत्व मिळू लागले. अमिताभ यांचा ‘नमक हराम’ हा सिनेमा पाहून राजेश खन्ना यांनी निर्माता दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगितले की, ‘हा नक्कीच उद्याचा सुपरस्टार आहे,’ (amitabh bachhan rajesh khanna interview)

photocourtesy: google rajesh khanan, rishikesh mukherji amitabh

राजेश खन्ना यांनी १९९० साली एका मासिकाला मुलाखत देताना अमिताभ यांना विचारले की, ‘‘नमक हराम, दीवार चित्रपट केल्यानंतर तुम्ही सुपरस्टार झाला आहात. मी हे यासाठी विचारत आहे की, एक वेळ अशी होती, जेव्हा मी टॉपवर होतो आणि सुपरस्टार हा शब्द माझ्यासाठी वापरला जायचा. आता तुम्हाला सुपरस्टार होऊन कसे वाटत आहे?’ ज्या अंदाजमध्ये राजेश खन्ना यांनी अमिताभ यांना हा प्रश्न केला, त्याच अंदाजमध्ये अमिताभ यांनी असे उत्तर दिले की, राजेश खन्ना बघतच राहिले. अमिताभ म्हणाले, “नाही माझ्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मला फक्त एवढे वाटते की माझे यश हे स्क्रिप्ट, निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्यावर अवलंबून आहे. मी बस तिथेच पोहचलो आहे.”

photocourtesy: google/rajesh khanna, amitabh

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. एकदा राजेश खन्ना यांनी अमिताभ यांची खिल्ली उडवली होती. कारण अमिताभ सेटवर वेळेत पोहचायचे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा