मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. राजेश्वरीने तिच्या एकाच चित्रपटातून तिची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते. तिने जास्त चित्रपटात काम केले नाहीत, पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने प्रत्येकाच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. तिचे वेगवेगळे फोटो तसेच व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिची प्रत्येक पोस्ट मोठ्या संख्येने व्हायरल होत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिचे बॉलिवूडवर देखील खूप प्रेम असल्याचे समजत आहे.
नुकतेच राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती टीव्ही बघताना दिसत आहे. ती तिचा हा वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. ती टीव्हीवर आमिर खान आणि अजय देवगण यांचा ‘इश्क’ हा चित्रपट बघत आहे. या चित्रपटात एक कॉमेडी सीन चालू असतो, तेव्हा राजेश्वरी हा सीन एन्जॉय करत खूप हसताना दिसत आहे. तसेच ती शेवटी या चित्रपटातील आमिर खानचा अभिनय करताना देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “वो दिन भी क्या दिन थे यार.” या व्हिडिओवर तिचे चाहते नेहमी प्रमाणेच कमेंटचा वर्षाव करत आहेत. (rajeshwari kharat’s video viral on social media )
राजेश्वरीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.
राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ


