Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा घटस्फोटाचा धक्का आणि महामारीची शिकार, रजनीकांत यांची लेक मोठ्या संकटात! Aishwarya Dhanush

घटस्फोटाचा धक्का आणि महामारीची शिकार, रजनीकांत यांची लेक मोठ्या संकटात! Aishwarya Dhanush

काही दिवसांपूर्वी आपला १८ वर्षांचा संसार मोडत दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का बसला होता. मात्र, आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘थलायवा’ रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या मंगळवारी (०१ फेब्रुवारी) कोरोना व्हायरसच्या तावडीत सापडली आहे. सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

ऐश्वर्याची पोस्ट
ऐश्वर्याने (Aishwarya Rajinikanth) आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “सर्व खबरदारी घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह सापडले. मी रुग्णालयात ऍडमिट आहे. कृपया नेहमी मास्क घाला, लसीकरण करा आणि सुरक्षित राहा. हे २०२२ मध्ये मला मिळाले. या वर्षात माझ्यासाठी आणखी काय आहे, ते पाहूया.”

ऐश्वर्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समजताच, चाहत्यांनी चिंता व्यक करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “ऐश्वर्या लवकर बरी हो.” तसेच आणखी एक चाहता म्हणाला की, “कृपया काळजी घे.”

मागील महिन्यात १७ जानेवारी रोजी धनुष आणि ऐश्वर्याने आपल्या चाहत्यांना निराश केले होते. त्यांनी १८ वर्षांपासून सुरू असलेला संसार मोडत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती.

हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा

धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या संयुक्त निवेदनात लिहिले होते की, “आम्ही मित्र, जोडपे, पालक आणि शुभचिंतक म्हणून १८ वर्षे एकत्र घालवली. हा प्रवास वाढीचा, समजूतदारपणाने, समायोजनाचा होता. आता आम्ही या टप्प्यावर उभे आहोत जिथून आमचे जीवन वेगळे होत आहे. आम्ही एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल. या निर्णयाचा आदर करा आणि त्यावर मात करण्यासाठी आम्हाला थोडी गोपनीयता द्या.”

धनुषने (Dhanush) १८ नोव्हेंबर २००४ रोजी एका पारंपारिक दक्षिण भारतीय समारंभात रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी धनुष २१ आणि ऐश्वर्या २३ वर्षांची होती. धनुषच्या ‘कधल कोंडेन’ चित्रपटात दोघांची पहिली भेट झाली होती. हे दोघे २ मुलांचे आई-वडील आहेत. त्यांच्या मुलांचे नाव यात्रा आणि लिंगा आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा