Monday, July 1, 2024

‘चांद्रयान-3’चं प्रक्षेपण कसं झालं दाखवतेय राखी सावंत; व्हिडीओ झाला व्हायरल, म्हणाली, ‘माझ्यामुळे…’

मनाला येईल तसे बोलणारी आणि वागणारी अभिनेत्री अभिनेत्री म्हणजे राखी सावंंत होय. तिला आयटम गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. नेहमी काही ना काही करण्याची इच्छा असणारी राखी ही सतत बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत येते. राखी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे मत बिधास्तपणे मांडताना दिसते.

राखी (Rakhi Rawant) सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात. तर दुसरीकडे नेटकरी तिला ट्रोल करत असतात. पण ट्रोलरचा विचार राखी कधीही करत नाही. 14 जुलै रोजी देशात ‘चांद्रयान 3’ (Chandrayaan-3) लाँच करण्यात आले आणि संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला. राखी सावंतनेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

राखी म्हणाली की, “चांद्रग्यानवर चंद्राची चांदणी आली आहे. तर देशावर आमदणी आली आहे. थोडं मागे जा, या चंद्रावर ग्रहण आणून नका नाहीतर काळोख पडेल. तुम्ही सर्वांनी बघितले आहे की, ‘चांद्रयान-3’चं प्रक्षेपण झालं आहे, ते फक्त माझ्यामुळे झालं आहे. मी आज ही पांढरी शुभ्र साडी परिधान केल्यामुळे ‘चांद्रयान-3’चं प्रक्षेपण यशस्वीरित्या झालं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे व्हिडीओत राखी ‘चांद्रयान-3’चं प्रक्षेपण कसं झालं ते दाखवतं दिसत आहे. काही माचिसच्या काड्या पेटवून ती ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण सर्वांना दाखवत आहे. व्हिडिओमध्ये राखीने मिरर-वर्क ब्लाउज आणि ऑक्सिडाइज्ड दागिन्यांसह पांढरी साडी परिधान केलेली दिसली. तिच्या या व्हिडिओ सोशल मीडियावर सतत चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “निदान आपल्या भारताच्या अभिमानस्पद असलेल्या क्षणांवर तरी विनोद करू नको.” दुसऱ्याने लिहिलं की, “चांगला व्हिडीओ आहे, पण यापुढे पुन्हा करू नको.” तसेच आनखी एकाने लिहिलं की, “आपल्या विद्धान शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची खिल्ली उडवणं बंद कर. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.” (Rakhi Rawant’s reaction to the successful flight of ‘Chandrayaan-3’ shared a video)

अधिक वाचा- 
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनीला पितृशोक! अभिनेता म्हणाला, ‘माझे बाबा…’
मैत्री असावी तर अशी! रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावूक; म्हणाले, ‘एक जीवलग मित्र…’

हे देखील वाचा