‘ड्रामा क्वीन’ राखीने स्वत:च्या शरीरावर कॅप्शन लिहून केले ‘बिग बॉस १५’ चे प्रमोशन, दिसला बोल्ड अंदाज


जेव्हा जेव्हा राखी सावंतचे नाव येते, तेव्हा लोकं आधीच कल्पना करत असतील की, काहीतरी अंतरंगीच बातमी असणार. कारण राखी म्हटले की, डोळ्यासमोर तिच्या चित्रविचित्र गोष्टी आणि तिचे वादच डोळ्यासमोर येतात. राखी जिथे जाते, तिथे तिच्या हरकतींनी प्रकाशझोतात येते. सोशल मीडियावरही ती तिच्या अनेक व्हिडिओ आणि फोटोंमुळे सतत चर्चेत असतेच. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्री गाजवणारी ही ‘ड्रामा क्वीन’ पुन्हा एकदा तिच्या एका हटके फोटोमुळे चर्चेत आली आहे.

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने ‘बिग बॉस’च्या पंधराव्या पर्वाची घोषणा केली आहे. या पर्वाची खास बाब ही असणार आहे की, हे पर्व वूट ऍपवर सर्वांना पाहता येणार आहे. म्हणजेच हे पर्व ओटीटीवर दाखवले जाणार आहे. याच शोच्या प्रमोशनसाठी राखीने तिचा एक हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने अतिशय वेगळ्या पद्धतीने बिग बॉसचे प्रमोशन केले आहे. राखीने तिच्या संपूर्ण शरीरावर लाल रंगाच्या पेंटने ‘ओटीटीवर पहिल्यांदाच बिग बॉस, बिग बॉस ओनली ऑन वूट’,’ बीबी ऑन वूट,’ अशा प्रकारचे मेसेज लिहिले आहेत.

राखीचा हा फोटो आणि तिचा हा अंदाज फॅन्ससोबतच कलाकरांना देखील आवडत आहे. तिच्या या फोटोवर फॅन्स कमेंट्स करून तिला पुन्हा बिग बॉसमध्ये जाण्यासाठी सांगत आहेत. ‘बिग बॉस १४’ मध्ये जेव्हा राखीने एन्ट्री केली होती, तेव्हा खरी मजा या गेममधे यायला सुरुवात झाल्याचे अनेक प्रेक्षकांनी म्हटले. त्यामुळे या पर्वातही प्रेक्षकांना पुन्हा राखीला पाहायची इच्छा आहे. राखीच्या या पोस्टवर राहुल वैद्य, अली गोनी, कश्मिरा शाह आणि पवित्र पुनिया यादी कलाकारांनी फनी ईमोजी पोस्ट केल्या आहेत.

राखीने नुकतेच राज कुंद्राच्या अटकेवर देखील बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करत राजला या प्रकरणात अडकवल्याचे सांगितले. सोबतच तिने राजला ट्रोल करणाऱ्या लोकांना “तुम्हाला लाज वाटत नाही का?,” असे देखील म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणात मराठमोळ्या उमेश कामतच्या फोटोचा वापर, संतप्त अभिनेत्याकडून कारवाईचा इशारा

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर


Leave A Reply

Your email address will not be published.