Thursday, March 28, 2024

‘तो तुम्हालाच उघडा दिसतोय’, रणवीर सिंगच्या न्यूड फोटो शूटबद्दल ‘हे’ काय बोलली राखी सावंत

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगने न्यूड फोटो शूट करत सर्वांनाच धक्का दिला होता. या फोटोशूटने सिने जगतात प्रचंड खळबळ माजली होती. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याचबरोबर रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर सोशल मीडियावर जोरदार टिकाही करण्यात आली होती. सध्या चर्चेत असलेल्या रणवीर सिंगच्या या फोटोंबद्दल राखी सावंतने (Rakhi Sawant) पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

राखी सावंत ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयात फारशी दिसत नसली तरी राखी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहत असते. नुकतेच तिने अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट बाबत पहिल्यांदाच खळबळजनक वक्तव्य केले आहे.

राखी सावंत अलिकडेच तिचा बॉयफ्रेंड आदिल खानसोबत फिरताना दिसली होती. यावेळी तिला माध्यमांनी प्रश्न विचारताच तिने हे वक्तव्य केले आहे. यावेळी राखीने सांगितले की तुम्हालाच ते फोटो न्यूड वाटतात कारण तुमची नजरच तशी आहे. रणवीर सिंग माझा लाडका भाऊ आहे. त्याच्याबद्दल कोणी काही बोललेल मला आवडणार नाही, असा स्पष्ट इशाराच राखीने सर्वांना  दिला आहे.

याबद्दलच पुढे बोलताना राखीने सांगितले की, “हे फोटोशूट करण्यामागचे कारण रणवीर सांगणार नाही पण मी सांगते. सध्या लंडनमध्ये प्रचंड गरमी आहे. गरमीने लोक हैराण झाले आहेत. त्यावेळी एसीही चालत नव्हता. म्हणूनच रणवीर सिंग कपडे काढून अंघोळीला गेला. आणि तो परत येईपर्यंत त्याचे कपडे गायब केले गेले. त्यामुळेच रणवीर सिंगला असे फोटोशूट करावे लागले.” दरम्यान, राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा – एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

अरेरे! रील बनवणे पडले परीला महागात, बालकलाकार मायरा वैकुळची झाली ‘अशी’ अवस्था

तब्बल ४० लाखांची कार, ५० लाखांचा डायमंड नेक्लेस, वाचा अंकिताला गिफ्टमध्ये काय काय मिळालेलं

 

हे देखील वाचा