सरकारने कृषी कायदा मागे घेण्यावर राखी सावंतने दिली प्रतिक्रिया; युजर्स म्हणाले, ‘मोदीपेक्षा जास्त हुशार तर….’


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मोदी सरकारने गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी तीन कायदे आणले होते, ज्याला अनेक शेतकरी संघटना सातत्याने विरोध करत होत्या. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर बॉलिवूड कलाकारांनी यावर अनेक ट्वीट केले. अशामध्ये जेव्हा राखी सावंतला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिनेही यावर आपले मत मांडले. आपल्या सेन्स ऑफ ह्युमरने सर्वांना हसवणारी राखी असे काही बोलली, ज्यानंतर नेटकरी तिची प्रशंसा करत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राखी कृषी कायदा मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेवर वक्तव्य करताना दिसत आहे. राखीला जेव्हा विचारण्यात आले की, मोदीजींनी शेतकरी कायदा मागे घेतला आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे? ज्यावर राखी म्हणते, “अभिनंदन. चला, आता सर्व शेतकरी सुखी होतील आणि हे आंदोलन सीमेवर होत होते, त्यांनी हँडल दुरुस्त केले होते. मला खूप आनंद आहे की, मोदीजींनी योग्य निर्णय घेतला आहे. हा फार पूर्वी घेतला असता, तर अनेक शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला नसता. त्यांना उपोषणही करावे लागत नाही. पण मोदीजी तुमचा निर्णय खूप चांगला आहे. जय जवान जय किसान.” (rakhi sawant reaction on pm modi to repeal all three farm laws see viral video)

राखीच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, “राखी अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोदींपेक्षा जास्त संवेदनशील आहे”. तर दुसर्‍याने लिहिले, “मोदी या दिवसाची वाट पाहत होते, जेव्हा निवडणूक येईल तेव्हा ते परत घेतील. जेणेकरून शेतकऱ्यांची मते मिळू शकतील. स्मार्ट मूव्ह.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य

-लवकरच शोमध्ये परतणार शमिता; एकटी नव्हे, तर ‘बिग बॉस १३’चे ‘हे’ दोन स्पर्धकही करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…


Latest Post

error: Content is protected !!