शिल्पा शेट्टीच्या पतीला राखी सावंतचा पाठिंबा; म्हणाली, ‘जरा तरी लाज वाटू द्या…’


अश्लील चित्रपट बनवून ते ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. २० जुलैला त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला आणि त्याचा साथीदार असणाऱ्या रायन थारोपे याला २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता राज कुंद्राची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे.

तत्पूर्वी राजला अटक झाल्यानंतर त्याला राखी सावंतने पाठिंबा दिला आहे. मुंबईमध्ये राखीला मीडियाने राज आणि शिल्पाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “शिल्पाने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये खूप मेहनत करत यश मिळवले आहे. त्याचे नाव खराब करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या परिवारात दखल देत त्यांना बदनाम केले जात आहे. माझा विश्वासच नाही राज कुंद्रा असे काही करू शकतो. राज एक चांगला व्यक्ती आहे. तो एक उद्योगपती असण्यासोबतच शिल्पाचा नवरा आहे. कोणीतरी त्याला ब्लॅकमेल करत असून, त्यांचे आणि शिल्पाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना शांततेत जगू द्या. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, याची तरी लाज बाळगा. हसत्या खेळत्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राज कुंद्रा आणि त्याच्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या भावाने केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी स्थापन केली. याच अंतर्गत चित्रपटांचे व्हिडिओ भारतात चित्रित केले जायचे. वी ट्रान्सफरच्या माध्यमातून केनरिनला पाठवले जायचे. ही कंपनी राज कुंद्रानेच स्थापन करत कंपनीची नोंदणी परदेशात केली, जेणेकरून भारताच्या सायबर लॉ पासून बचाव करता येईल.

राजच्या अटकेनंतर त्याचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर एच नावाचा एक ग्रूप दिसत आहे, ज्याचा अ‍ॅडमिन राज आहे. या ग्रूपवर राज, त्याचे काही नातेवाईक आणि पॉर्न मूव्ही मेकर कंपनी प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन प्रदीप बख्शी यांच्याशी पैशांच्या व्यवहार आणि कंटेंट पोस्टिंगविषयी चर्चा करत असल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.