Friday, February 3, 2023

‘जंजीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये फ्लॉप एन्ट्री घेणाऱ्या रामचरणच्या ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटांनी केला यूटुबरवर रेकॉर्ड

सध्या बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला आहे. हिंदी भाषेतील चित्रपटांनाही मागे टाकत हे साऊथ सिनेमे आता टॉपवर पोहचले आहेत. या चित्रपटांमधील ऍक्शन, कथा, उत्तम तंत्रज्ञान आणि कलाकारांचा दमदार अभिनय आदी अनेक गोष्टींचा जोरावर या हे सिनेमे त्यांचा झेंडा गाडताना दिसत आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमे पुन्हा एकदा सिद्ध केले की, साऊथ चित्रपटांना आता हिंदी सिनेमे देखील हरवू शकत नाही. साऊथ चित्रपटांचे नाव काढताच अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे डोळ्यासमोर येतात. यातलेच एक महत्वाचे नाव म्हणजे रामचरण. आरआरआर सिनेमाची घोषणा झाल्यापासून किंवा सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून रामचरण सतत चर्चेत आहे. रामचरण हे नाव दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील मोठे नाव असले तरी आता ते नाव बॉलिवूडमध्ये देखील नवीन नाही. अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘जंजीर’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला. पण दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबिंगमधून तो संपूर्ण देशात लोकप्रिय झाला. आता तर आरआरआर सिनेमाच्या निमित्ताने त्याच्या लोकप्रियतेची प्रचिती सर्वांना येत आहे. रामचरणचे काही सिनेमे सध्या यूटुबवर प्रचंड गाजताना दिसत आहे. या सिनेमांनी यूटुबवर चांगलाच धमाका केला आहे. जाणून घेऊया त्याच्या याच काही चित्रपटांबद्दल.

चिरुथा :
२००७ साली आलेल्या या तेलगू ऍक्शन चित्रपटाने भरपूर यश कमावले. रामचरण, नेहा शर्मा, आशीष विद्यार्थी आणि प्रकाश राज यांच्या दमदार अभिनयाची ट्रीट असलेला हा सिनेमा ऍक्शन क्राईम थ्रिलर ड्रामा आहे.

मगधीरा :
२००९ साली आलेल्या या सिनेमात रामचरणसोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. हा सिनेमा पुनर्जन्मावर आधारित आहे. हा एक फँटसी ऍक्शन सिनेमा असून यात देव गिल, सुनील वर्मा, ब्रह्मानंदम, राव रमेश, शरत बाबू, रघुमुद्री श्रीहारी आदी कलाकारांच्या भूमिका होत्या.

ऑरेंज :
२०१० साली आलेल्या या सिनेमात रामचरण आणि जेनिलिया यांनी एकत्र काम केले होते. हा एक रोमॅंटिक कॉमेडी ड्रामा सिनेमा होता. सिनेमात अशा मुलाची काठ दाखवली गेली ज्यात एक मुलगा प्रेम आयुष्यभर राहू शकते यावर विश्वास ठेवायला तयार नसतो.

ध्रुवा :
रामचरणचा हा एक दमदार ऍक्शन सिनेमा असून, यात तिने एका आयपीएस पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. जो मेडिकल इंडस्ट्रीमधील क्राईम संपवण्यासाठी प्रयत्न करतो. या सिनेमात रामचरणसोबत रकुलप्रीत आणि अरविंद स्वामी दिसले होते.

येवाडु :
हा देखील रामचरणचा एक एक्शन थ्रिलर सिनेमा असून, यात त्याच्यासोबत श्रुती हसन आणि एमी जॅक्सन होते. या सिनेमात अल्लू अर्जुन आणि काजळ अग्रवाल यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा