‘इंदिरा गांधीनी केला कंगनासारखा अभिनय’ रामगोपाल वर्मा यांचे वादग्रस्त ट्विट चर्चेत

0
77
kangana ranaut
Photo Courtesy: Instagram/ kangana Ranaut

हिंदी सिने जगतातील अनेक कलाकार त्यांच्या विवादीत वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांना नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागते. अशी विवादास्पद वक्तव्य करुन वादात सापडणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री कंगणा रणौतचे (Kangana Ranaut) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या विवादीत वक्तव्यांमुळे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने रामगोपाल वर्मा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला सुरूवात केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री कंगणा रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. इमर्जन्सी चित्रपटात अभिनेत्री कंगणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगणाचा चित्रपटातील लूक समोर आला होता. ज्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. रामगोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत इंदिरा गांधी आणि कंगणाची तुलना केली आहे.

रामगोपाल वर्मा यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रामगोपाल वर्मा यांनी “विश्वास ठेवू अगर ठेवू नका पण इंदिरा गांधी यांनी कंगणा रणौतसारखा अभिनय केला आहे,” असा कॅप्शन दिला आहे. या व्हिडिओवरुन रामगोपाल वर्मा यांनी इंदिरा गांधी यांची कंगणा रणौतसोबत थेट तुलना केली आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कंगणा रणौतच्या या बहुचर्चित चित्रपटात अभिनेते अनुपम खेरही महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार  उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा –

आदिल खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या ट्रोलवर संतापली राखी सावंत, रागारागात लग्नाबाबत केले मोठे वक्तव्य

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here