Saturday, April 20, 2024

आदिल खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या ट्रोलवर संतापली राखी सावंत, रागारागात लग्नाबाबत केले मोठे वक्तव्य

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) नेहमीच चर्चेत असते. तिच्या विचित्र शैलीपासून ते वादग्रस्त विधानांपर्यंत ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेचा विषय बनत असते. सध्या राखी तिचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. कधी ती एअरपोर्टवर आदिलसोबत रोमँटिक होते, तर कधी मीडियामध्ये तिच्या आणि आदिलच्या नात्यातील समस्या सांगताना दिसते. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

वास्तविक, राखी सावंत नुकतीच आदिलसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान, मीडियाशी संवाद साधताना, जेव्हा तिने आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरी हिच्याकडून ट्रोल झाल्याबद्दल सांगितले, ज्यामध्ये तिने राखी आणि आदिलचे प्रेम खोटे सांगितले होते, तेव्हा राखी आश्चर्यचकित झाली. यानंतर ती भावूक होते आणि आदिलला विचारते की त्याचे तिच्यावर प्रेम आहे का? यानंतर आदिल त्याला म्हणतो की, हो करतो. राखी रागाने म्हणते, “तिची आमच्याबद्दल असं बोलण्याची हिम्मत कशी झाली.”

आदिल राखीला तिच्याशी थेट बोलायला सांगतो. तेव्हा राखी म्हणते की ती माझी एक्स नाही, ती तुझी एक्स आहे. ती पुढे म्हणते की, रोशिना तिचा फोन उचलत नाही, फक्त व्हॉईस मेसेजिंगद्वारे तिला धमकावत आहे. यानंतर राखी सावंतने तिच्या लग्नाची घोषणा केली. राखी म्हणते, “रोशिना तू जमेल तेवढं ट्रोल कर, आदिल माझा आहे. तू आमच्यासाठी काहीही करू शकत नाहीस. आदिल म्हणाले तर ते जास्त बरोबर आहे. भविष्यात आपण दोघेही लग्न करणार आहोत.” यानंतर ती रोशीनाला तिला आणि आदिलला त्रास देऊ नकोस असे सांगते.

यापूर्वी आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडची एक कमेंट व्हायरल होत होती, ज्यामध्ये रोशिनाने राखीला टार्गेट केले होते. राखीसाठी रोशिना म्हणाली होती, “मला माहित नाही की एक महिला इतके खोटे कसे बोलू शकते आणि तिला याचे वाईटही वाटत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी? आता राखीने देखील तिला प्रत्युत्तर दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

रणवीरनंतर ‘या’ साऊथ सुपरस्टारने केली हद्द पार, नग्न होत पत्नीलाच सांगितले, ‘तू काढ फोटो!’

फॅमिली मॅन ते मनी हाईस्ट, २०२१ मध्ये ‘या’ १० वेबसीरिजने केल्या चाहत्यांच्या बत्त्या गुल

हे देखील वाचा