Tuesday, May 21, 2024

रामानंद सागर यांच्या पणतीवर लैंगिक अत्याचार? साक्षीने केला धक्कादायक खुलासा

टिव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण‘ प्रत्येक घराघरात एक वेगळी ओळख निर्मान केली आहे. या मालिकेचा पहिला भाग 1987 मध्ये टिव्हीवर प्रसारित झाला होता. 78 भागांची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेला आता 36 वर्ष उलटून गेली आहेत. या मालिकेती प्रत्येक पात्राने एक नवी ओळख निर्माण केली होती. रामानंद सागर यांच्या नातवाची मुलगी साक्षी चोप्राने तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. साक्षी चोप्रा विषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री साक्षी चोप्राने (sakshi chopra) नेटफ्लिक्स शोच्या निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. साक्षी नेटफ्लिक्स शोचा एक भाग होती. याशिवाय करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी खोटी आश्वासने आणि फसवणूक केल्याचा आरोपही तिने केला आहे. साक्षीने तिच्या इंस्टाग्राम पोस्ट करत संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. या शोदरम्यान तिला आलेलेला किळसवाणा अनुभव साक्षीने सांगितले आहे.

साक्षी चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो शेअर करत असते. साक्षी चोप्राचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. साक्षी चोप्राने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले की, “शोच्या निर्मात्यांनी तिला लैंगिक शोषणाचा एक भाग बनण्यास भाग पाडले होते. नेटफ्लिक्सच्या ‘सोल प्रॉडक्शन’मध्ये तिचे लैंगिक शोषण झाले. कारण तेव्हा मी माझ्या ड्रेसबद्दल स्पष्टपणे बोलले होते.”

साक्षी चोप्रा पुढे म्हणाली की, ‘त्यांना वाटले की मी हे घाणेरडे कृत्य सहन करेल. पण अस अजिबात नाही. मला आयुष्यात शांतता हवी आहे. शोमध्ये काम करताना मी आगोदरच सांगितले होते की, मला माझ्या कुटुंबीयांचा एक दिवसही फोन आला नाही, तर मी सही करणार नाही. कारण मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही. त्यावेळी त्यांनी या सर्व गोष्टी स्वीकारल्या होत्या. परंतु शोमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी त्या गोष्टाची पर्वा केली नाही.

साक्षी चोप्राने दावा केला आहे की, शोच्या निर्मात्यांनी तिला तिच्या आईशी बोलूही दिले नाही. एवढेच नाही तर जेव्हा साक्षीने टास्क आणि लैंगिक छळाचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रॉडक्शन टीमने तिचा फोन जप्त केला होता. जेव्हा मी माझ्या आईला टास्क आणि लैंगिक छळाबद्दल सांगितले तेव्हा तिने माझा फोन हिसकावून घेतला, त्यानंतर तिने मला कॉल करू दिला नाही, असे साक्षी म्हणाली. (Ramanand Sagar’s ‘Ramayana’ fame Sakshi Chopra sexually assaulted)

अधिक वाचा- 
अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! 24 वर्षीय अभिनेत्याचा भीषण अपघात, ऐन तारूण्यात गमावला पाय 

हे देखील वाचा